Tag Archives: उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

‘इतर राजकीय पक्षांचेही मोर्चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चेप्रमाणे निघायला हवेत. मला या मोर्चापेक्षा ११ ऑगस्ट रोजी निघालेल्या मोर्च्याची अधिक चिंता आहे’, असे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. बांगलादेशीयांविरोधातील शिवसेनाप्रमुखांची रोखठोक भूमिका सर्वांना हळूहळू का होईना पटत आहे, याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

मुंबईत ‘२६/११’ रोजी जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्या विरोधात प्रशांत धनूर या तरुणाने साक्ष दिली होती. त्यामुळे शिवसनेने त्याला बेस्ट उपक्रमात नोकरी मिळवून दिली आणि ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रशांतला नियुक्तीचे पत्रही देण्यात आले. त्यानंतर उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘जोपर्यंत मते मिळवण्यासाठी देशाची वाट लावणारे पक्ष सत्तेवर आहेत, तोपर्यंत देशाचे काही खरे नाही. मुंबईतील हिंसाचाराबद्दल संसदेत मुंबईतील खासदारांनी बाजू मांडली नाही. इथले खासदार मौन पाळतात का’, आसाम मध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल संदर्भ देत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

उद्धव म्हणाले की, ‘कोळसा खाणीचा जो घोटाळा झाला, त्या प्रकरणी ‘एनडीए’त पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत चर्चा व्हायला हवी. पण नुसते पंतप्रधन बदलून काहीही साध्य होणार नाही तर, घोटाळे करणारे सरकारच गेले पाहिजे’.

एकटा टायगर
राज्यभरात शिवसेनाप्रमुखांची ‘एकटा टायगर’ या आशयाची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. ‘एकटा टायगर म्हणजे एकच वाघ. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या खूर्चीची कधीही पर्वा न करता त्यांनी नेहमी देशद्रोहीयांविरोधातल्या भूमिकेला अधिक महत्त्व दिले. वेळोवेळी त्यांनी जे इशारे दिले तेही खरे ठरत आहेत. मध्यंतरी येथे मुंबईत पाकिस्तानांतून एक तुकडी आली होती. त्यांनीही सांगितले की बाळासाहेबांच्या नावाने पाकिस्तानात लोकांची टरकते. त्यामुळे ‘एकटा टायगर’ हे विशेषण बाळासाहेबांनाच लागू होते’, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.