Tag Archives: उपवासाचा ढोकळा

उपवासाचा ढोकळा

साहित्य :

  • शिंगाडा पीठ दोन वाटी
  • भाजलेल्या दाण्याचे कूट एक वाटी
  • आंबटसर ताक दोन वाटी
  • मिरची
  • आले
  • मीठ
  • जिरे
  • खाण्याचा सोडा
  • ओले खोबरे थोडेसे
  • चिरलेली थोडी कोथिंबीर

कृती :

उपवासाचा ढोकळा

उपवासाचा ढोकळा

शिंगाडा पीठ २/३ तास ताकात भिजवून ठेवावे. त्यात अंदाजे चवीपुरते मीठ, आले व मिरच्याचे वाटण, थोडा सोडा, थोडे जिरे घाला. चांगले कालवून घ्या. मिश्रण तयार करा.

मग एका चपट्या स्टीलच्या डब्याला आतून तुपाचा हलकासा हात लावून त्यात वरील पिठाचे मिश्रण घालावे.

नंतर अर्धा तास कुकरमध्ये वाफवून घ्या. निवत आल्यावर वड्या पाडा. वड्यांवर थोडेसे खवलेले ओले खोबरे, थोडी चिरलेली कोथिंबीर पेरावी.