Tag Archives: उपवासाचा बटाटे वडा

उपवासाचा बटाटे वडा

साहित्य :

 • मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे सहा किंवा अर्धा किलो
 • मिरची,आले,जिरे यांचे वाटण प्रत्येकी एकेक चहाचा चमचा
 • थोडीशी कोथिंबीर चिरून
 • लिंबू एक
 • चिमुटभर साखर

इतर साहित्य :

 • वरई
 • शिंगाडा पीठ
 • प्रत्येकी पाऊण वाटी
 • जरुरीप्रमाणे तिखट
 • मीठ
 • खाण्याचा सोडा दोन चिमूट
 • तूप तळण्यासाठी

कृती :

उकडलेले बटाटे साले काढून परातीत कुस्करून ठेवा. त्यात सर्व वाटण, मीठ, कोथिंबीर घालून मळा, त्यात लिंबू पिळा, पुन्हा एकदा चांगले मळून घ्या. याचे हातावर लहानसर वडे थापून घ्या. हे झाले सारण. आता दोन्ही पिठात तिखट, सोडा, मीठ टाकून पीठ भिजवा. पीठ चांगले फेटून घ्या. कढईत तूप गरम करा. कालवलेल्या पिठात वडे बुडवून ते गरम तुपात तळा. उलटून दोन्ही बाजू लालसर झाल्यावर काढून घ्या. हे गरम गरम वडे उपवासाच्या चटणीबरोबर खा.