Tag Archives: उपवासाचा सांजा

उपवासाचा सांजा

साहित्य :

  • वरई तांदूळ एक वाटी
  • साखर एक वाटी
  • थोडे बेदाणे व काजू
  • २/३ वेलदोडे
  • लवंगा १/२
  • तूप
  • जायफळ पूड

कृती :

वरई तांदूळ निवडून धुऊन निथळत ठेवा. भांड्यात थोडे तूप टाकून मंद गॅसवर तापत ठेवा. त्यात लवंगा टाका. त्यातच वरई तांदूळ घालून भाजून घ्या. मग त्यात सव्वा वाटी गरम पाणी घाला. थोडे ढवळून भांड्यावर झाकण ठेवा. पाणी कमी होऊन वरई शिजली की त्यात साखर घाला. मिश्रण ढवळून घ्या. वरई शिजत आली की त्यावर चिमटीभर जायफळपूड, वेलदोडा पूड, काजूचे तुकडे व बेदाणे टाका. मिश्रण थोडे ढवळून घ्या. तयार झाला असे दिसताच भांडे खाली उतरा. गरम खा किंवा गार झाल्यावर खा. छान लागतो.