Tag Archives: उपवासाचे मोदक

उपवासाचे मोदक

साहित्य :

  • वरईचे पीठ एक वाटी
  • पाऊण वाटी पाणी
  • थोडे मीठ
  • तूप

सारणाचे साहित्य :

  • साखर एक वाटी
  • एक नारळ लहान
  • वेलदोडे पूड

कृती :

नेहमी जसे मोदक करतात. तसेच हेही मोदक करतात. प्रथम नारळ खवून घ्या. खवात साखर टाकून सारण शिजवावे. शिजल्यावर त्यात वेलदोडे पूड घाला. एक जाड बुडाचे पातेले घेऊन त्यात पाऊण वाटी पाणी घाला. थोडे मीठ आणि एक चमचा तूप घाला. पाणी उकळत ठेवा. उकळी आली की त्यात वरई पीठ ठेवा. वाफा येऊ लाघल्या की पातेले खाली उतरवा. एका ताटाला तुपाच हात लावून त्यात थोडे थोडे पीठ टाकून मळा. चांगले मळल्यावर या पिठाच्या पाऱ्या करून त्यात तयार करून ठेवलेले सारण भरून मोदक करून घ्यावेत. ते मोदक पात्रात साधारण दहा मिनिटे वाफवून घ्या. पात्र खाली उतरा. उपवासाचे मोदक तयार.