Tag Archives: उपवासाचे वऱ्यांचे लाडू

उपवासाचे वऱ्यांचे लाडू

साहित्य :

  • दीड वाटी वरई तांदूळ
  • साखर दीड वाटी
  • थोडा नारळाचा खव
  • थोडी वेलदोडा पूड
  • थोडे काजू काप
  • बेदाणे
  • थोडे तूप

कृती :

वऱ्याचे तांदूळ निवडून घ्या. त्याचा मिक्सरमधून जाडसर रवा काढून घ्या. गर्म तुपावर रवा चांगला भाजा. रवा भाजत आला की त्यात नारळ खव घाला. मिश्रण भाजून ढवळून भांडे उतरून ठेवा. एका भांड्यात साखरेच्या निम्मे पाणी घालून त्यात साखर घालून नेहमी लाडूसाठी करतो तसा एकतारी पाक तयार करा. पाक तयार झाल्यावर त्यात वरईचा भाजलेला रवा घाला. ढवळा. नंतर भांडे खाली उतरवा. त्यात काजू काप, बेदाणे, वेलदोडा पूड घाल. मिसळून लाडू वळा. खा.