Tag Archives: उपवासाचे सार

उपवासाचे सार

साहित्य :

  • ७/८ आमसुले
  • लाल वाळलेल्या मिरच्या २
  • थोडे जिरे
  • थोडे साजूक तूप
  • चवीसाठी थोडासा गूळ
  • मीठ

कृती :

आमसुले धुऊन एक, दीड वाटी पाण्यात दोन तास भिजत घाला. नंतर त्यातच कुस्करून त्याचा रस गाळून घ्या. भांड्यात तूप गरम करा. जिरे, मिरच्या घाला. जिरे तडतडू लागल्यावर त्यात आमसूल कोळ घाला व थोडे पाणी घाल. थोडा गूल व मीठ घाला. मंदाग्नीवर थोडावेळ तसेच ठेवा. मग भांडे उतरून ठेवा.सार तयार.