Tag Archives: उष्णवाहक

त्वचेचे आरोग्य व निगा

  • उन्हाळ्यात बाहेर जाताना पांढरी टोपी, हॅट घाला किंवा फेटा बांधा, उघड्या डोक्याने उन्हात फिरू नये.
  • उन्हाळ्याच्या दिवसांत ओला टॉवेल डोक्यावर ठेवा.
  • उन्हात बाहेर जाताना पांढऱ्या छत्रीचा उपयोग करा. शक्य तोवर उन्हात चालत जाऊ नका. वाहनाचा करा.
  • उन्हाळ्यात कांदा-कैरीची कोशिंबीर खा. ताक घ्या.
  • रबरी तळ असलेली पादत्राणे उन्हाळ्यात वापरू नयेत. रबर उष्णवाहक आहे. रबरी जोडे घालून डांबरी रस्त्यावर चालल्याने डोळे बिघडतात. पायांचे तळवे गरम होतात. त्यामुळे शरीराचे तंत्र बिघडते.
  • आहारात श्रीखंड, दही, मट्ठा, ताक, कांदा तसेच पेय यांचे प्रमाण जास्त असू द्या. माव्याची मिठाई, फरसाण यांचा उपयोग कमीत कमी करा. पोट पूर्ण भरण्याआधीच पानावरून उठा. दोन घास कमीच खा. पोटभरून जेवल्यावर उन्हात जाऊ नका.