Tag Archives: ऊसाच्या रसातील पोळी

ऊसाच्या रसातील पोळी

साहित्य :

  • २ ग्लास ऊसाचा रस
  • २ पळ्या तेल
  • ४ ग्लास कणीक
  • पाव चमचा मीठ

कृती :

ऊसाचा रस घेऊन त्यात कणीक, तेल व मीठ घालून नेहमीप्रमाणे पोळ्यांच्या कणकीप्रमाणे कणीक भिजवावी त्याच्या आपल्या आवडीप्रमाणे पोळ्या कराव्यात.

टीप : पोळीबरोबर चिंचेचा ठेचा दही घालून खायला द्यावा. या पोळ्या धान्यफराळासाठीपण चालतात. पोळ्यांप्रमाणे ज्वारीच्या पिठात रस घालून दशम्या केल्यासही चांगल्या लागतात.