Tag Archives: ऑपेरा हाऊस

मुंबईत ३ ठिकाणी बॉम्बस्फोट

मुंबईत ३ ठिकाणी बॉम्बस्फोट

मुंबईत ३ ठिकाणी बॉम्बस्फोट

मुंबईमध्ये आज सायंकाळी लागोपाठ तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याने देशाची आर्थिक राजधानी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरली आहे. दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीन ठिकाणी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी आयईडीच्या मदतीने घडवण्यात आलेल्या या स्फोटांमध्ये १० ते १५ लोक ठार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या स्फोटानंतर मुंबई, महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीतही गृहखात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

संध्याकाळी ६.५० ते ७ वाजण्याच्या दरम्यान दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीन ठिकाणी आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस) म्हणजेच रोडसाइड बॉम्बच्या मदतीने हे स्फोट घडवण्यात आले, अशी माहिती गृहखात्याने दिली. हे स्फोट म्हणजे मुंबईवरील दहशतवादी हल्ला असल्याची कबुलीही गृहखात्याने दिली आहे.