Tag Archives: औरंगाबाद जिल्हा

औरंगाबाद जिल्हा

औरंगाबाद जिल्हा प्रसिद्ध आहे तो अजिंठा आणि वेरुळ येथील लेण्यांमुळे, दौलताबादच्या किल्ल्यामुळे, घृष्णेश्वर येथील ज्योतिर्लींगामुळे आणि संतभूमी या नात्याने!

अजिंठ्याच्या लेण्यात शिल्पकाम असले तरी ती जगप्रसिद्ध आहेत, ती तेथील भित्तीचित्रांमुळे- या भित्तीचित्रांमधून प्रकट होणाऱ्या अमिजात चित्रकलेमुळे !

वेरूळ प्रसिद्ध आहे ते तेथील अप्रतिम कैलास लेण्यामुळे. या सौंदर्यशाली शैलमंदिराच्या खोदकामास राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याच्या कारकिर्दीत प्रारंभ झाला. आठव्या शतकात प्रथम कृष्णराजाच्या कारकिर्दीत या शैलमंदिरास पूर्णत्व प्राप्त झाले. ‘आधी कळस मग पाया!’ या पद्धतीने हे लेणे साकारलेले आहे!

सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मोगल व निजाम यांच्या राजवटी येथे नांदल्या. त्यामुळे जिल्ह्यात संमिश्र संस्कृतीचा सुंदर मिलाफ झालेला आढळतो. चक्रधरस्वामी, बहिणाबाई, भानुदासम एकनाथ, मुक्तेश्वर व अमृतराव यांसारख्या संताच्या शिकवणुकीने सहिष्णुतेचा पाठच या जिल्ह्यास घालून दिला आहे!