Tag Archives: करवंद

माझं कोकण

दर्‍याखोर्‍यातुन जाते माझ्या कोकणाची वाट
मला ओढुनिया नेते माझ्या दाराशी हि थेट

फणसासारखे मधुर इथल्या माणसांचे मन
राजापुरच्या गंगेमुळे भाविकही होती धन्य

कोकणात माझ्या निळा विस्तीर्ण सागर
मौज वाटे पाहण्यास मासोळ्यांचे सूर

लालबुंद या मातीत तांदुळ वरीची पिके
कोकणाचा हापुस आंबा अवघे जग जिंके

करवंद, जांभुळ, काजु हा तर कोकणी मेवा
निसर्गाने दिला जणु अनमोल ठेवा

पोटासाठी चाकरमानी मुंबईला जाई
परी शिमगा, गणपतीला परतुनी येई

माझ्या कोकणाची काय सांगु मी महती
दूर जाता कोकणासाठी डोळे पाणावती