Tag Archives: कांदा

खरंच असं कधी घडेल का

खरंच असं कधी घडेल काखरंच असं कधी घडेल का? खरंच असं कधी घडेल का? ॥ धृ ॥
ओसाड पडली family restaurant उजाड झाले सर्व bar
नको आम्हाला pizza burger भली चांगली कांदा भाजी भाकर
निर्व्यसनाचे महत्व आम्हा कधी तरी कळेल का??? ॥ धृ ॥

एक धागा जणू लज्जेचा एक धागा सौंदर्याचा
धागा धागा विणुनी झाला जन्म वस्त्राचा
fashion show मध्ये वस्त्र सरावे स्थिती आहे का खरी ???
वस्त्रा देऊनी जन्म माणसा गरज त्याची कधी कळेल का ??? ॥ धृ ॥

granite, marble, softsety नी hall राहीला भरुनी
oven, microwave, juicer यांचे kitchen झाले मिळूनी
AC, bed, dressing-table,bedroom मध्ये आले जुळुनी
‘आपली माणसे’ झाली guest, guest-room चे महत्व आम्हा कधी कळेल का??? ॥ धृ ॥

यंत्र युगाचा ठेवा आम्ही घरोघरी जपला खरे
खऱ्या घराचे घरपण सांगा कधी तरी मिळेल का??
अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या गरजा पशु बनूनच भागवाव्यात का???
माणूस म्हणून जगून बघूया खरंच असं कधी घडेल का???
खरंच असं कधी घडेल का? खरंच असं कधी घडेल का? ॥ धृ ॥