Tag Archives: किटक नाशके

रंगीत द्राक्ष-मनोज जाधव

नाशिक जिल्ह्यातील सैय्यद पिंप्री येथील मनोज जाधव या तरुण द्राक्ष बागाईतदाराने सन २०१० या सिझनमध्ये नवीन रंगीत निर्यातक्षम द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेऊन रंगीत द्राक्षांची निर्यातही केली. त्यांनी पहिल्या वर्षीच्या द्राक्ष बागेत एकरी ८.५ टन मालाचे उत्पादन घेऊन ५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.
रंगीत निर्यातक्षम द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेण्याविषयी मनोज जाधव यांनी चर्चा करतांना सांगितले की, माझ्याकडे वडिलांनी लावलेली ओनरुटची १५ वर्षाची जुनी सिडलेस बाग होती. बाग जुनी झाल्याने उत्पन्न कमी मिळत होते. म्हणून ती बाग काढून तिथे ९५ अंतरावर बंगलोर डॉगरीजची स्टस्टॉक हुंडी मार्च २००८ मध्ये लावली. मार्च ते सप्टेंबर ह्या सहा महिन्याच्या कालावधीत माती परिक्षणाच्या अहवालानुसार खतांचे नियोजन केले. शेणखत २३:२३:०, १९:१९:१९ (लिकीड खत) व युरीया यांचा वापर करून झाड चांगले काढून घेतले.

कमी खर्चात जास्त उत्पादन मिळावे यासाठी प्रत्येक शेतकरी प्रयत्नात असतो. कमीत कमी कालावधीत कमीत कमी संजीवके वापरुन १८ पल्स साईज देणारी, १८ च्या पुढे ब्रिक्स असणारी स्थानिक व निर्यात करण्या योग्य असणारे द्राक्ष जात कोणती, हा विचार मनोज जाधव करीत असतांनाच त्यांचा कल पहिल्यापासून रंगीत जातीकडे अधिक होता. कलर व्हरायटीला साईज मिळण्यास विशेष अडचण येत नाही. पेपर लावायची गरज पडत नाही. नोव्हेंबर, डिसेंबर मधील खाली जाणाऱ्या तापमानांना कलर व्हरायटीज आकर्षक रंग येण्यास फायदाच होतो. स्थानिक बाजार पेठेत सुद्धा सफेद द्राक्षापेक्षा कलर व्हरायटीला १०/- रुपयाने किलोमागे दर व मागणी जास्त असते.

कलर व्हरायटीज करण्यासाठी नानासाहेब परमल या जातीचे वाण खरेदी करण्याचे मनोज जाधव यांनी निश्चित केले. नानासाहेब परमल जातीच्या वाणाची काही ग्रिफ्टींगसाठी आणली. १ सप्टेंबर २००८ ला पाऊस झाल्यानंतर ग्रिफ्टींगनंतर जे वातावरणे फुटण्यासाठी पाहिजे ते तयार झाले १२ सप्टेंबर पासून डोळे फुटण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस उडद्या, गोगलगायीपासून डोळ्यांचे संरक्षण केले. सुरुवातीपासून आंतरप्रवाही बुरशीनाशकाचे योग्य नियोजन केल्यामुळे डायनीतून ग्राफटींग केलेली बाग वाचविली.

सप्टेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन करून रिकूटपर्यंत बागेची चांगली वाढ करुन घेतली. नंतर ३.५ फुटावर रिकूट घेतला. व ७.५ सबकेन स्टॉप अ‍ॅन्ड गो पद्धतीने तयार केल्या व एक झाडावर सप्टेंबरपर्यंत १२ ते १४ कांड्या चांगल्या करून घेतल्या. नाशिक जिल्ह्यातील बऱ्याचशा द्राक्ष बागाईतदारांनी ग्रिफ्टींगसाठी कांडीची मागणी केली. सप्टेंबर महिन्यात १ लाख डोळे नाशिकमधील द्राक्ष बागाईतदारांना ग्रिफ्टींगसाठी दिले. इथ्रेल स्प्रे करून पानगळ करून बागेची छाटणी केली.

पहिल्याच वर्षी सप्टेंबर २००९ ला कांडी देऊन एका झाडावर ४० ते ४५ घड निघाले ते विरळणीमध्ये कमी करून एक झाडावर मोजून २२ घड ठेवले. सर्व कामे वेळेवर केलीत आणि निर्यातक्षम दर्जाचा २० प्लस साईजचा व १८+ ब्रिक्स शुगरचा मल तयार झाला. द्राक्ष शेती करतांना योग्य वानाची निवड, योग्य नियोजन वेळीच औषधे किटक नाशकांचा वापर केल्यास एकरी जास्त उत्पादन काढता येते असे मनोज जाधव यांनी सांगितले.