Tag Archives: किल्ला

किल्ला

मौल्यवान चीज

विन्सबरी येथील किल्ल्याला शत्रुनं वेढा घातला. किल्ल्यातील किल्लेदार व सैन्य यांनी जवळ जवळ तीन महिने शत्रुशी चिवट झुंज दिली; पण अखेर किल्ल्यातील दाणागोटा संपला आणि शरणागती पत्करण्याची वेळ आली.

आता किल्ला पडला, की शत्रूसैन्य आत घुसून गडावरील पुरुषांची सरसहा कत्तल करणार हे हेरून, गडातील चारपाच स्त्रियांच एक शिष्टमंडळ शरणागतीचा एक पांढरा बावटा घेऊन गडाबाहेर पडलं व शत्रुकडे गेलं. शत्रुसैन्यातील सेनापतीला गाठून ते म्हणालं, ‘किल्लेदार, आम्ही तुमच्या ताब्यात किल्ला द्यायला तयार होत, पण अगदी दोन साध्या अटींवर. पहिली अट ही की, किल्ल्यातील स्त्रिया व मुलं-मुली यांना तुम्ही जराही त्रास न देता किल्ल्याबाहेर पडू द्यावं, आणि दुसरी अट ही की प्रत्येक स्त्रिला तिच्या दृष्टीनं सर्वात मौल्यवान असलेली एक चीज उचलून घेऊन आपल्याबरोबर नेण्याची परवानगी असावी.’

विनाकारण वेढ्याचा व लढाईचा काळ लांववित बसण्यापेक्षा या दोन साध्या अटी मान्य केलेल्या बऱ्या, असा विचार करुन शत्रुच्या सेनापतीनं त्या अटी आपल्याला मान्य असल्याचं त्या स्त्रियांच्या शिष्टमंडळाला वचन दिलं. त्याबरोबर ते शिष्टमंडळ परत गडावर गेल, पण थोड्याच वेळात बरोबर मुलं-मुली व पाठीवर आपापला नवरा, भाऊ वा पिता यांपैकी कुणीतरी एक पुरुष घेतलेल्या स्त्रियांचा प्रवाह त्या किल्ल्याबाहेर वाहू लागला !

तो अजब प्रकार पाहून शत्रुनं त्या बायानां विचारलं, ‘हे काय ? तुम्ही स्त्रिया आपापली मुलं मुली, आणि एकेक मौल्यवान चीज घेऊन बाहेर पडण्याचं कबूल केलं असता, तुम्ही एकेका पुरुषाला पाठीवर घेऊन का चाललात ? त्या बाया म्हणाल्या आमच्या दृष्टीनं सर्वात मैल्यवान असलेली चीजच आम्ही पाठीवर घेवुन जात आहोत.’