Tag Archives: किशोर कुमार

४ ऑगस्ट दिनविशेष

जागतिक दिवस

  • क्रांती दिन : बर्किना फासो.
  • संविधान दिन : कूक द्वीपसमूह.

ठळक घटना

  • १५७८ : अल कस्र अल कबिरच्या लढाईत पोर्तुगालचा राजा सेबास्टियाव पहिला मृत्युमुखी.
  • १६९३ : दॉम पेरिन्यॉँने आपले विशिष्ट शॅम्पेन प्रकारचे मद्य तयार करण्यास सुरुवात केली.
  • १७८९ : फ्रांसच्या राष्ट्रीय सभेने जहागिरदारीची पद्धत बंद करण्याचे ठरवले.१८२४ – कोसची लढाई.
  • १९१४ : पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.
  • १९४४ : ज्यूंचे शिरकाण – गेस्टापोने ऍन फ्रँक व तिच्या कुटुंबास अटक केली.
  • १९४७ : जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.
  • १९६४ : व्हियेतनाम युद्ध – अमेरिकेच्या यु.एस.एस. मॅडोक्स व यु.एस.एस. सी. टर्नर जॉय या दोन युद्धनौकांवर हल्ला झाल्याचे वृत्त. येथून युद्धास गंभीर वळण लागले. अनेक वर्षांनी असे सिद्ध झाले की हा हल्ला झालाच नव्हता.
  • १९८३ : थॉमस संकरा बर्किना फासोच्या (तेव्हाचे अपर व्होल्टा) राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९८४ : अपर व्होल्टाने आपले नाव बदलुन बर्किना फासो असे ठेवले.
  • १९९१ : क्रुझ शिप ओशनोस दक्षिण आफ्रिकेजवळ बुडाली. बरेचसे खलाशी व अधिकाऱ्यांनी पळ काढला. सगळ्या ५७१ प्रवाश्यांना वाचवण्यात यश आले.
  • १९९३ : टॅक्सीचालक रॉडनी किंगच्या मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल लॉस एंजेल्सच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना ३० महिन्याची कैद.
  • २००६ : आनंद सत्यानंद न्यू झीलँडच्या गव्हर्नर-जनरलपदी.

जन्म

  • १५२१ : पोप अर्बन सातवा.
  • १७९२ : पर्सी शेली, इंग्लिश कवी.
  • १८०५ : विल्यम रोवन हॅमिल्टन, आयरिश गणितज्ञ.
  • १८३५ : जॉन व्हेन, इंग्लिश गणितज्ञ.
  • १८९४ : ना. सी फडके (नारायण सीताराम फडके), प्रत्येक मराठी माणसाचे आवडते, प्रसिद्ध कथा-कादंबरीकार.
  • १९२९ : किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.
  • १९३१ : नरेन ताम्हाणे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९४० : अब्दुर्रहमान वहीद, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४२ : डेव्हिड लँग, न्यू झीलँडचा पंतप्रधान.
  • १९५५ : बिली बॉब थॉर्न्टन, अमेरिकन अभिनेता.
  • १९६० : होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो, स्पेनचा पंतप्रधान.
  • १९६१ : बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी.

मृत्यु

  • १०६० : हेन्री पहिला, फ्रांसचा राजा.
  • १३०६ : वेंकेस्लॉस तिसरा, बोहेमियाचा राजा.
  • १५७८ : सेबास्टियाव पहिला, पोर्तुगालचा राजा.
  • १८७५ : हॅन्स अ‍ॅंडरसन, जगातील प्रसिध्द परीकथा लेखक.
  • १९१९ : डेव्हिड ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५७ : वॉशिंग्टन लुइस परेरा दि सूसा, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६७ : पीटर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.