Tag Archives: कुंभार

काटे खाणारा गाढव

एका कुंभाराचा गाढव, पाठीवर खाण्याचे पदार्थ घेऊन, शेतात आपल्या धन्याकडे चालला होता. जाता जाता वाटेत, एक लहानसे बाभळीचे झुडूप त्याच्या दृष्टीस पडले. त्याचे कोवळे कोवळे कटे आणि पाने खाण्यासाठी तो अंमळ उभा राहिला आणि खाता खाता आपल्याशीच म्हणतो, ‘माझ्या पाठीवर इतके खाण्याचे पदार्थ असता, ते सोडून, मी हे काटे खात उभा राहिलो आहे, हे पाहून लोकांस मोठे आश्चर्य वाटेल यांत संशय नाही. ’

तात्पर्य:- प्रत्येकाची रुचि निराळी असते.