Tag Archives: कुरण

दुखणाईत सांबर

एक सांबर आजारी पडले, तेव्हां ते आपल्या चरावयाच्या कुरणात, एका कोपऱ्यात स्वस्थ पडून राहिले होते. त्या कुरणात चरणारे त्याचे सोबती इतर पशु त्याच्या समाचारासाठी येत असत; त्यापैकी प्रत्येक पशु त्या सांबरापुढे ठेवलेल्या गवतातले काही गवत खाऊन जात असे. असे होता, पुढे ते गरीब बिचारे सांबर मरण पावले. ते रोगाने मरण पावले नाही तर, त्याचा समाचार घेण्यास येणाऱ्या पशूंनी त्याच्यापुढील सगळे गवत खाऊन टाकल्यामुळे केवळ उपासमारीने मेले !

तात्पर्य:- दुष्ट सोबती हितापेक्षा अहितच फार करतात.