Tag Archives: कॅनडा

हे आम्हीच करू

अमेरिकेकडे आम्ही संगंणक मागायला गेलो. अमेरिकेने अपमानकारक अटी घातल्या. त्या आम्ही नाकारल्या व ‘ परम १०००० ’ संगणक निर्माण झाला. एका संयंत्राची दुरुस्ती कॅनडाने सहकार्य नाकारल्यावर आमच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञानी कमी वेळात, कमी खर्चात केली. रशियाकडून क्रायोजेनिक इंजिने मिळत नाहीत हे कळल्यावर आम्ही तशी तयार केली. हे कुणीतरी नाकारल्यानंतर स्वतः करणे कशासाठी ? आम्हीच कोणाची मदत मागणार नाही ही जिद्द का नाही ? ही ही सुरुवात घरातूनच कशी होईल ?

मुलांना स्वाध्यायाची सवय लावायला हवी. शिकवणी वर्ग व मार्गदर्शक पुस्तके यांचा वापर जवळजवळ थांबवून, त्यांच्या नैपुण्याला व क्रियाशीलतेला वाव देऊन ‘ तू हे करू शकतोस ’ हा आत्मविश्वास जागवून, जो स्वतः करू शकत नाही त्याला दुसऱ्याला हसण्याचा अधिकार नाही ही जाणीव देऊन. ‘ मी हे करीनच ’ ही जिद्द निर्माण करून आम्ही हे घडवू शकतो. पालक व शिक्षक यांनी मात्र तसे ठरवायला हवे. एकेका व्यक्तीत निर्माण झालेला स्वाभिमान हा स्वाभिमानी कुटुंबात व पर्यायाने स्वाभिमानी समाजात परावर्तित होईल.