Tag Archives: कैरीची आमटी

कैरीची आमटी

साहित्य :

 • २ कैऱ्या
 • अर्धी वाटी नारळ
 • २ चमचे उडीद डाळ
 • २ चमचे तांदूळ
 • मोहरी
 • मेथ्या
 • हळद
 • धने (प्रत्येकी अर्धा चमचा)
 • २-४ सुक्या मिरच्या
 • तेल
 • मीठ

कृती :

नारळ खरवडून घ्यावा. कढईत थोडे तेल घालून उडीद डाळ व नंतर तांदूळ भाजावेत. नंतर मेथ्या, हिंग, धने, मिरच्या भाजावेत व नारळ टाकावा. त्यावर हळद टाकावी. थोडा नारळ बाजूला ठेवून मिक्सरमधून तो वाटून घ्यावा व तो रस बाजूला ठेवावा. उरलेला नारळ, राहिलेला चोथ सर्व बारीक वाटावे. जास्तीच्या तेलात हिंग, मेथी, मोहरी घालून फोडणी करावी. त्यात कैरीच्या फोडी टाकून परताव्यात.परतल्यानंतर नारळाचा रस टाकावा. नंतर परतून त्यावर आपल्या आवडीनुसार वाटण पातळ करून घालावे. त्यात गूळ, मीठ टाकावे. जास्त आंबट झाल्यास कैरीच्या फोडी काढून ठेवाव्यात. चांगली उकळी आणावी. ही आंबट-गोड आमटी जेवणाचा स्वाद वाढवते.