साहित्य :
- ५०० ग्रॅम कोवळा दुध्या भोपळा
- १ लीटर दूध
- १ मोठी वाटी साखर
- १ टे. चमचा कॉर्नफ्लोअर
- ८-१० वेलदोड्याची पूड
- बदामाचे करा.
कृती :
दुध्या भोपळा घ्या. नंतर दुधात मिसळून गॅसवर ठेवा. मधून मधून हलवत रहा.दुध्या शिजला व दूध साधारण पाऊणपट राहिले की त्यात साखर घाला. साखर विरघळली की त्यात कॉर्नफ्लोअरमध्ये थोडे दूध मिसळून ते घाला. वेलदोड्याची पूड घाला. वरून बदामाचे काप घाला. ४-५ माणसांना वरील बासुंदी पुरते. कोवळ्या दुध्यामुळे ही बासुंदी दुध्याची असेल असे वाटतही नाही.