Tag Archives: कोकम सरबत

कोकम सरबत

साहित्य :

  • १ किलो कोकम
  • २ किलो साखर
  • चवीनुसार मीठ

कृती :

कोकमाची साले बारीक चिरून घ्यावीत. बिया काढाव्यात. १ किलो कोकमात २ किलो साखर घालून ठेवावी. १/२ दिवसात त्याला भरपूर रस सुटतो. तो गाळून घ्यावा. हा रस म्हणजे कोकम सरबत यामध्ये सरबत करून देताना पाव भाग सरबत व पाऊण भाग पाणी, थोडे मीठ व थोडी जिरेपूड घालून द्यावे.