Tag Archives: कोफ्ता

फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी

साहित्य :
कोफ्त्यासाठी :

 • १/२ किलो फ्लॉवर
 • ३-४ हिरव्या मिरच्या
 • १/२ लिंबाचा रस
 • ६० ग्रॅम चीझ
 • ३ ब्रेडचे स्लाईस
 • १/४ चमचा गरम मसाला
 • थोडेसे वाटलेले आले
 • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • मीठ

ग्रेव्ही :

 • २ मोठे कांदे
 • १ मोठा टोमॅटो

मसाला :

 • ५-६ लसूण पाकळ्या
 • १ आल्याचा लहानसा तुकडा
 • १/२ चमचा धणे
 • १ चमचा जीरे
 • १/४ चमचा हळद
 • १ चमचा हळ्द
 • १ चमचा तिखट
 • मीठ

कृती :

फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी

फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी

फ्लॉवर किसून घ्यावा व अगदी थोड्या पाण्यात शिजवून घ्यावा. सर्व पाणी आटले पाहिजे.

नंतर त्यात किसलेले चीझ बारीक चिरलेल्या मिरच्या, लिंबू रस, मीठ, आले, लसूण, गरम मसाला घालावा.

ब्रेडचा स्लाईस पाण्यात भिजवून हाताने दाबून त्यातले पाणी काढून टाकावे व तो फ्लॉवरच्या मिश्रणात घालावा.

मिश्रण चांगले मळून घ्यावे व त्याचे छोटे छोटे गोळे करुन तळून घ्यावेत.

ग्रेव्हीसाठी मसाला बारीक वाटून ठेवावा. थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा. त्यावर वाटलेला मसाला घालून परतावे.

नंतर त्यावर टोमॅटोचा रस घालावा. रस जरा दाटसर झाला की त्यात तळलेले कोफ्ते घालावे.

आयत्या वेळी वरुन थोडासा गरम मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.