Tag Archives: कोरडी बटाटा भाजी

कोरडी बटाटा भाजी

साहित्य :

  • उकडून सोललेले बटाटे चार/पाच
  • ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • थोडे दाणेकूट
  • नारळ खव थोडा
  • थोडी चिरलेली कोथिंबीर
  • थोडे जिरे
  • थोडे तूप
  • मीठ

कृती :

सोललेल्या बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. कढईत तूप गरम करा. त्यात जिरे, मिरची तुकडे घाला. जिरे तडतडू लागल्यावर त्यात बटाटे फोडी घाला. थोडे परतून घ्या. आच कमी करा. नंतर त्यावर नारळ खव, दाणेकूट, मीठ घाला. थोडे परता. त्यावर चिरलेली कोथिंबीर पेरा. हवे असल्यास त्यावर लिंबू पिळा. बटाटा भाजी तयार.