Tag Archives: कोलंबू

टोमॅटोचे तिखट कोलंबू

साहित्य :

  • ३०० ग्रॅम टोमॅटो
  • २ मध्यम कांदे
  • ५ लसूण पाकळ्या
  • ४ चमचे तेल
  • अर्धा चमचा मोहरी
  • ४ हिरव्या मिरच्या
  • दीड चमचा तिखट
  • अर्धा चमचा हळद
  • चवीनुसार मीठ

कृती :

टोमॅटो धुवून चकत्या कराव्यात. कांद्याच्याही चकत्या कराव्या. किंवा कांदे व मिरच्या उभ्या चिराव्यात. तेल तापले की मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यावर मिरच्या व कांदा घालून चारपाच मिनिटे परतावा. लसूण पाकळ्या ठेचून घालाव्या. टोमॅटो, तिखट, हळद व मीठ घालून मिनिटभर ढवळावे. दोन वाट्या गरम पाणी घालून टोमॅटो शिजेपर्यंत चुलीवर ठेवावे.

यातच आवडीसवडीनुसार, अर्ध्या नारळाचा चव व चमचाभर बडीशेप एकत्र वाटून घालावी. टोमॅटो शिजल्यानंतर वाटण घालावे व दोन मिनिटे उकळले की खाली उतरवावे.