Tag Archives: कोळंबी

दही कोळंबी

साहित्य :

  • २ वाटी सोललेली कोळंबी
  • ३ कांदे
  • ७-८ हिरव्या मिरच्या
  • आल्याचा मोठा तुकडा
  • २ वाटी दही
  • ४ चमचे तेल
  • मीठ
  • १ चमचा साखर

मसाला :

  • अर्धा चमचा हळद
  • १ चमचा जिरे
  • ७-८ मेथी दाणे

कृती :

दही कोळंबी

दही कोळंबी

कोळंबी स्वच्छ करून धुवून घ्या. कोळंबीला मीठ, हळद लावून ठेवा.

जिरे, मेथीची पूड करून ठेवा. आले, हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्या.

कांदे उभे, पातळ चिरून घ्या. दही घुसळून ठेवा.

जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदा गुलाबीसर परतवून घ्या.

नंतर त्यात आले, हिरव्या मिरच्या घालून परतवा.

त्यात अर्धा पेला पाणी घालून कोळंबी शिजवून घ्या.

कोळंबी शिजली की त्यात घुसळलेले दही घाला.

त्यात जिरे-मेथीची पूड घाला.