Tag Archives: कोहळा

कोहळा वडी

साहित्य :

  • कोहळा
  • साखर
  • खवा
  • वेलचीपूड
  • थॊडे बदामाचे काप

कृती :

कोहळा वडी

कोहळा वडी

कोहळा किसून घ्यावा. कोहळ्यात फार पाणी असते, म्हणून तो पिळून घ्यावा व थोड्या तुपावर त्याचा किस टाकून परतावा.

नंतर झाकण ठेवून वाफवून घ्यावा. नंतर हा किस एखाद्या पातेलीने मोजून घ्यावा.

जेवढा किस असेल त्याच्या दुप्पट साखर घ्यावी. १ पातेली कोहळ्याचा किस, २ पातेल्या साखर व १/४ पातेली खवा असे प्रमाण आहे.

वाफवलेल्या कोहळ्याचा कीस, साखर, खवा, वेलचीपूड व बदामाचे काप एकत्र करुन गॅसवर ठेवावे.

घट्ट गोळा होत आला की, तूप लावलेल्या थाळीत थापावे व वड्या पाडाव्यात.

ह्या वड्या थंडीच्या दिवसात करतात.

अशाच वड्या दुध्या भोपळ्याच्या कराव्या.