Tag Archives: क्रिम

मशरूम सूप

साहित्य :

  • २०० ग्रॅम मशरूम
  • १०० ग्रॅम बीट
  • २ कांदे
  • २ मोठे चमचे लोणी
  • १ लहान चमचा मैदा
  • १ कप दूध
  • २ मोठे चमचे ताजे क्रिम
  • १ लहान चमचा मीठ
  • १/२ लहान चमचा काळी मिरी पावडर
  • १ लिंबू

कृती:

मशरूम सूप

मशरूम सूप

मशरूम व बीटचे लहान लहान चिरून तुकडे करा. कांदा मिक्सरमधून काढून घ्या.

कुकरमध्ये मशरूम व बीट ६ कप पाण्याबरोबर उकडून घ्या. गार झाल्यावर गाळून घ्या.

एका भांड्यात लोणी गरम करा व कांदा भाजून घ्या. कांदा लालसर झाल्यावर त्याच्यात मैदा टाकून १ मिनीट भाजा.

आता दूध टाकून हलवत राहा. मशरूम सूप, मीठ, काळी मिरी पावडर टाका. १० मिनीटे हलवत रहा.

सूप तयार आहे. गरम सूप पिण्यास द्यावे.