Tag Archives: खजुर

खजुराच्या साटोर्‍या

साहित्य :

 • १ वाटी बिनबियाचा खजूर
 • १ वाटी डाळीचे पीठ (बेसन)
 • १ वाटी पिठीसाखर
 • १ टेबल चमचा खसखस
 • अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
 • ७-८ वेलदोड्यांची पूड
 • पाव चमचा जायफळ पूड
 • २ टेबल चमचा मिल्क पावडर
 • दीड वाटी मैदा
 • दीड वाटी कणीक
 • २ टेबल चमचा तेलाचे मोहन
 • चवीसाठी मीठ
 • तूप.

कृती :

मैदा, कणीक, तेल व मीठएकत्र करून नेहमी पुऱ्यासाठी पीठ भिजवतो तसे जरा घट्ट पीठ भिजवून ठेवा.खसखस व खोबरे भाजून घ्या. खसखशीची पूड करा. खोबरे हाताने चुरडाव. २ टेबल चमचा तुपावर डाळीचे पीठ भाजा.नंतर खजूर, डाळीचे पीठ, पिठीसाखर, खसखस, खोबरे, वेलदोड्याची व जायफळाची पूड सर्व एकत्र करून सारण तयार करावे.वरील पिठाच्या दोन पुऱ्या लाटून घ्या. एका पुरीवर खजुराचे सारण पसरा. त्यावर दुसरी पुरी ठेवून कडा बंद करा. नंतर अगदी थोडी पिठी वापरून साटोरी लाटा. नंतर तव्यावर दोन्हीकडून शेका व दुसऱ्या गॅसवर दुसरा तवा ठेवून त्यावर साटोरी टाकूनकडेने तूप सोडून लालसर झाली की काढा. दोन गॅसवर दोन तवे ठेवा. एका गॅसवर मध्यम आंचेवर साटोरी शेकून घ्या व लगेचच दुसऱ्या गॅसवर थोडे तूप घालून जरा वेळ भाजून घ्या व खाली काढा. साटोऱ्या बराच वेळ नुसत्या भाजून ठेवल्या, तर तिवल्यावर वाफेमुळे ओलसर होतात. मग त्या नीट तळल्या जात नाहीत. साटोऱ्या ४ दिवस टिकतात. त्यामुळे सोयीने केव्हाही करून ठेवता येतात.