Tag Archives: खडा मसाला

खडा मसाला मटण

साहित्यः

  • ५०० ग्रा. मटण
  • ५ मोठे चमचे तेल
  • २ कापलेले कांदे
  • १ चमचा किसलेले आले
  • ४ कळी कापलेली लसुण
  • ६ लाल मिरची
  • ३ मोठी विलायची
  • २ तुकडे दालचिनी
  • ६ काळी मिर्च दाणे
  • ३ लवंग
  • १॥ चमचा मीठ चवीनुसार
  • २॥ कप पाणी
  • २ कापलेल्या हिरव्या मिरच्या
  • १/२ कप कापलेली कोथंबीर

कृतीः

खडा मसाला मटण

खडा मसाला मटण

तेल गरम करून कांद्यास लालसर भाजावे. नंतर आले व लसूण टाकून २ मिनीट फ्राय करावे. लाल मिरचीचे दोन तुकडे करावे व विलायची, दालचिनी, काळी मिर्च, लवंग व मीठाबरोबर टाकावे.

मटण टाकावे व ५ मिनीटे फ्राय करावे. नंतर पाणी टाकुन कमी गॅसवर ३५-४० मिनीटे शिजवावे.

जेव्हा मटण शिजेल आणि पाणी आहे तेव्हा कोथंबीर व हिरवी मिरची टाकावी, तेल सोडेपर्यंत शिजवावे नंतर सर्व्हिंग डिशमध्ये काढुन नान किंवा भाताबरोबर गरम गरम करावे.