Tag Archives: खमीर

भटुरे

साहित्य:

  • ३२५ ग्रा. मैदा
  • १ चमचा मीठ
  • २ चमचे खमीर
  • फेटलेले अंडे
  • १२५ ग्रा. दही
  • २-३ मोठे चमचे गरम पाणी
  • तळणासाठी तेल

कृतीः

भटुरे

भटुरे

मैदा, मीठ आणि खमीर एका पेल्यात ठेवून व्यवस्थित मिळवावे. अंडे, दही आणि गरम पाणी टाकुन पीठास मळुन घ्यावे आणि ४-६ तासासाठी गरम ठिकाणी ठेवावे.

आता याचे बरोबर ६ भाग करावे आणि पुर्‍यांसाठी गोल-गोल लाटावी. तेल गरम करून भटूरे लालसर तळावे नंतर छोल्यांबरोबर गरम गरम खावे.