Tag Archives: खव्याची पोळी

खव्याची पोळी

साहित्य :

  • अर्धा किलो खवा
  • अर्धा किलो पिठी साखर
  • अर्धा किलो मैदा
  • १ वाटी रवा
  • अर्धी वाटी तेल
  • ५-६ वेलचीची पूड

कृती :

खवा कढाईत परतून खमंग झाला की खाली उतरवून गार करावा. त्यात पिठीसाखर व वेलचीची पूड घालावी. मैदा व रवा एकत्र करून त्यात तेल गरम करून घालावे. मैदा कणकीप्रमाणे भिजवून त्याच्या पुरीएवढ्या लाट्या करून २ लाट्यांमध्ये १ खव्याचा गोळा चपटा करून घालून सर्व बाजूंनी पोळीच्या लाट्या
दाबून बंद कराव्यात व त्याची पोळी लाटवी.

टीप : ह्या पोळ्या २-३ दिवस चांगल्या टिकतात.