Tag Archives: खसखस

बटाट्याची बाकरवडी

साहित्य :

 • १ किलो बटाटे
 • अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर
 • १ नारळ
 • १०-१२ हिरव्या मिरच्या
 • १ इंच आले
 • ७-८ लसूण पाकळ्या
 • ४-५ लवंगा
 • ४ दालचिनीच्या काड्या
 • २ टेबलस्पून खसखस
 • १ चमचा जिरे
 • १ कोथिंबिरी मोठी जुडी
 • १ चमचा गरम मसाला
 • मीठ
 • थोडे डाळीचे पीठ
 • तिखट.

कृती :

प्रथम बाकर तयार करून घ्या. ३-४ हिरव्या मिरच्या, आले लसूण अत्यंत बारीक चिरा.कोथिंबिर अगदी बाईक चिरा. खसखस भाजावी व पूड करावी. लवंग, दालचिनी, जिरे वाटावी. नारळाचे खोबरे जरा भाजावी व खाली उतरवा. नंतर त्यात कोथिंबीर, मिरच्या आले, लसूण खसखशीची पूड, वाटलेले लवंग, दालचिनी, जिरे व मीठ घालून कालवा व सारण तयार करा. ह्यालाच बाकर असे म्हणतात. कोथिंबीर कोरडी असावी.बटाटे उकडून, गरम आहेत तोवरच किसावे. नंतर त्यात कॉर्नफ्लोअर, चवीपुरेसे मीठ व वाटलेल्या ५-६ मिरच्या घालून गोळा करावा. बटाट्याच्या ओलसरपणावर कॉर्नफ्लोअर कमीजास्त लागेल.

नंतर बटाट्याचा बेताचा गोळा घेऊन प्लॅस्टिकवर त्याची पोळी लाटावी. नंतर त्यावर बाकर पसरून गुंडाळावी. जेवढे बटाट्याचे गोळे होतील तेवढे सारणाचे भाग करावे. गुंडाळलेल्या पोळीचे अळूवडीप्रमाणे तुकडे कापावे.डाळीचे पिठात तिखट, मीठ घालून भज्यापेक्षा जरा पातळ पीठ भिजवा. त्यात एकेक वडी बुडवून तळा.