Tag Archives: खांडवी

खांडवी

साहीत्य :

  • दीड वाटी तांदळाचा रवा
  • ३ वाट्या उकळीचे पाणी
  • दीड वाटी बारीक चिरलेला गूळ
  • पाऊण वाटी ओले खोबरे
  • अर्धा चमचा मीठ
  • १ इंच आल्याचा तुकडा वाटून घेणे.

कृती:

तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे. नंतर त्याचा रवा काढावा, रवा कोरडाच भाजून घ्यावा.
पाणी कोजून तयार करावे. पाण्याला उकळी आली की त्यात गूळ, खोबरे, मीठ व वाटलेले आले घालावे. नंतर त्यात रवा घालावा. ढवळून झाकण ठेवावे. मिश्रण घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत थापावे. वरून आणखी ओले खोबरे घालून हलक्या हाताने थापावे. थंड झाल्यावर वड्या कापाव्या. कोकणात पक्वान्न म्हणून करतात. वरील रवा तुपावर भाजल्यासही चालेल.