Tag Archives: खारोड्या

बाजरीच्या खारोडय़ा

साहित्य:

  • अर्धा किलो बाजरी
  • दोन वाटय़ा ताक
  • मीठ
  • एक कांदा
  • दोन चमचे लसूण पेस्ट
  • सात-आठ बारीक चिरलेली मिरची

कृती:

बाजरी निवडून तीन-चार तास पाण्यात भिजत घाला. नंतर उपसून मिक्सरवर दळा अथवा खलबत्त्यात कांडा. मिक्सरवर केल्यास जरासे भरडेच वाटा. रात्री ताकात बाजरीचे पीठ भिजवा. रात्रभर पीठ आंबू द्या. दुसऱ्या दिवशी चार वाटय़ा पिठाला आठ वाटय़ा पाणी घ्या. गॅसवर मोठय़ा भांडय़ात पाणी उकळू द्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण पेस्ट, बारीक चिरलेली मिरची व मीठ घाला. पाणी चांगले उकळल्यावर त्यात बाजरीचे आंबवलेले पीठ घालून चांगले शिजू द्या. मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा. पिठाला दाटपणा आल्यावर चांगले हलवून गॅसवरून खाली उतरवा. जरा थंड झाल्यावर प्लास्टिक पेपरवर अथवा ताटावर छोटय़ा मुगोडय़ांप्रमाणे टाका. कडक उन्हात दाने-तीन दिवस वाळवा. चांगले वाळवल्यावर कच्चे तेल व कांदा बारीक चिरून घाला

या खारोडय़ा तळत नाहीत.