Tag Archives: खिचडी

खिचडी

साहित्य:

  • १ कप तांदुळ
  • ३/४ कप मूग डाळ
  • १/२ चमचे जीरे
  • १ चुटकी हिंग
  • १/२ चमचा हळद
  • ३/४ चमचे मीठ
  • ३॥ कप पाणी
  • १ मोठा चमचा तेल

कृती:

खिचडी

खिचडी

कुकरमध्ये तेल गरम करून हिंग, जीरे फ्राय करावे. मग डाळ-तांदुळ टाकावे दोन मिनीट चालवून पाणी, हळद व मीठ टाकावे आणि कूकर बंद करून कमी गॅसवर ठेवावा.

एक शिटी झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि कूकरला ८-१० मिनीट बंद ठेवावा.

ही गरमागरम खिचडी लोणचे किंवा हिरव्या चटणी सोबत खावी.