Tag Archives: खोबर

मसुराच्या पिठाचे लाडू

साहित्य :

  • २५० ग्रॅम मसुराचे पीठ
  • २०० ग्रॅम गूळ
  • १२५ ग्रॅम डालडा तूप
  • ५० ग्रॅम खसखस
  • १ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
  • ५-६ वेलदोडे
  • थोडासा बेदाणा.

कृती :

खसखस भाजावी व कुटावी. खोबरे-कीस भाजाव व हाताने कुस्करावा. गुळ बारीक चिरून ठेवावा.तुपावर पीठ भाजा. नंतर खाली उतरवा. जरा कोमट झाले की त्याट गूळ घाला. खसखस, खोबरे, बेदाणा व वेलदोड्याची पूड घाला. नंतर मिश्रण कालवून लाडू वळा.