Tag Archives: गंगासागर

गंगासागर

साहित्य :

  • १ किलो ताजे दही
  • १ वाटी साखर
  • ४-५ थेंब रासबेरी इसेंस
  • १ चिमूट लाल रंग
  • १ वाटी क्रीम
  • व्हॅनिला इसेंस

कृती :

क्रीम, व्हॅनिला इसेन्स व साखर एकत्र करून चांगले फेटावे व गार करण्यास ठेवावे. दही फ्रिजमध्ये ठेवावे. गार झाल्यावर त्यात साखर, रंग व रासबेरी इसेन्स घालून फेस येईपर्यंत मिक्सरच्या जारमध्ये फिरवावे. सुंदर गुलाबी रंगाची लस्सी तयार होईल. देताना प्रथम लस्सी व त्यावर गार केलेले साखर क्रीमचे मिश्रण घालून द्यावे.