Tag Archives: गजकर्ण

औषधी पपई

नियमाने पपई खाल्ल्यास भूक वाढते :

पपई

पपई

पपई हे फार मोठे औषध आहे. रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचते. पपईचा चीक गजकर्ण, खरूज, नायटा या त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो.

जंतावर हे एक चांगले औषध आहे. हा चीक व मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा. त्यात दुपट्ट गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचाभर ओळीने तीन दिवस द्यावा. जंत पडून जातात.

गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. त्यांना ती अपायकारक असते.