Tag Archives: गणेशोत्सव

सर्व बाप्पांची गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी

सर्व बाप्पांची गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी

सर्व बाप्पांची गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी

१९ सप्टेंबरला आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. आपण सर्वच जण या दहा दिवसांची आतुरतेने वाट बघत असतो. ‘सर्व बाप्पांची गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी’ हे विनोदी लेखन दोन भागात सादर करण्याचा मराठीमाती प्रयत्न करणार आहे.

पृथ्वीवर जशी गणेश मंडळाची आणि एकूणच भक्तांची गणेशोत्सवाची जोरदार तयारी चालू आहे, बैठका सुरु आहेत त्याचप्रमाणे स्वर्गातही बप्पा आपल्या पृथ्वीवरील एन्ट्रीची तयारी करत आहेत. तेथेही पृथ्वीवर जाण्यापुर्वी पुर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच सर्व बाप्पांची एक मिटींग झाली त्याचाच हा लेखाजोखा.

चितांमणी (अध्यक्ष) :  मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कि, १९ सप्टेंबर रोजी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे भक्तांच्या आग्रहाखातर पृथ्वीवर जात आहोत. तर पृथ्वीवर जाताना घ्यावयाची काळजी, सूचना तसेच allocation प्रक्रिया यासंबधी मार्गदर्शन करण्यासाठी आजची बैठक बोलवण्यात आली आहे. घरोघरी जाणाऱ्या गणपतींची allocation प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता महत्वाची सार्वजनिक मंडळे आणि सेलिब्रेटी गणपतीं ची निवड प्रक्रिया आजच्या वैठकीत होईल आणि ही निवड पुर्णत: अनुभवांच्या बेसिसवर होईल त्यामूळे कोणाही नाराज होऊ नये. पुढील सूचना मंडाळाचे सेक्रेटरी हेरंब देतील.

हेरंब (सेक्रेटरी) :
सुचना क्रं १ :  गणेश चतुर्थीला पृथ्वीवर जाताना बरीच ट्रॅफिक असणार आहे हे लक्षात घेऊन काही मोठया गणपतींना आधीच पाठवण्याची सोय करण्यात आली आहे. छोटे गणपती आधी एक दिवस निघतील. काही विषेश गणपतीसाठी विमानांची सोय करण्यात आली आहे. बाकीच्यांनी बेस्ट, लोकल मिळेल त्या वाहनांचा अवलंब करावा.
सुचना क्रं २ : पुण्यातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता सर्वच पुणेकर गणपतींना लवकर पाठवण्यात येणार आहे.
सुचना क्रं ३ : पुण्यातील प्रदुषणापासून दूर रहाण्यासाठी सर्व पुणेकरांना एक स्पेशल मास्क देण्यात येणार आहे. तो सगळयांनी थ्रुआऊट फेस्टिवल सोडेंला लावून ठेवावा. सोडेंला बसणाऱ्या मास्कची ओर्डर देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरला न विसरता पुणेकरांनी कार्यालयातून मास्क घेऊन जावे.
सुचना क्रं ४ : मोदक खाताना संयम बाळगा. खव्यातील भेसळीचे प्रमाण वाढले आहे म्हणून खव्याचे मोदक खा पण at u r own risk. अगदीच काका हलवाई किंवा चितळे असतील तर टेस्ट करायला हरकत नाही.
सुचना क्रं ५ : पुणेकर तुम्ही खवय्यांच्या गावा जात आहात. सदाशिव पेठ जवळ असली तरी विनाकरून ताव मारुन कॅलरिज वाढवू नका. येताना तर त्रास होईलच पण इथे आल्यानंतर रिध्दी सिध्दि तुमची खैर ठेवणार नाही.
सुचना क्रं ६ : पृथ्वीवरील स्त्रीभॄण हत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यंदा गौरींना मोठया प्रमाणात पाठवण्याचा प्रस्ताव अखिल स्वर्ग परिषेदेच्या बैठीकीत मंजुर करण्यात आला आहे. (सगळेजण टाळ्या वाजवतात)
सुचना क्रं ७ : जाताना आईवडिलांचा आशिर्वाद नक्की घ्या. पृथ्वीवरच्या सफारी साठी All The Best
सुचना क्रं ८ : येताना ही ट्रॅफिक जाम असेल त्यामुळे तुम्हाला विसर्जनानंतरही येण्यासाठी थोडा अवधी लागू शकतो. आपल्या लाडक्या भक्तांसाठी तेवढा त्रास सहन करा.

“आता कूणाला काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असल्यास विचारा.”

गणेश : मला यंदा पॄथ्वीवर जायचे नाही.

हेरंब : पण का?

गणेश : मला भिती वाटतेय?

हेरंब : कसली?

गणेश : दहशतवादाची, सारखे हल्ले नाहीतर बॉम्ब्स्फोट होतच असतात. त्यातून गणेशोत्सोव नको रे बाबा.

गजानन : अरे पण खास पोलिस बंदोबस्त असतो की, आपल्यासाठी.

गणेश : पोलिसांना स्वत:चच रक्षण करता येत नाही ते आपलं काय करणार? त्याचंच मानसिक खच्चीकरण झालय.

हेरंब : अरे माझ्या राज्या, राज आलाय की! त्याचं कैवार घेयाला आणि तु तर त्यांचा सार्‍यांचाच लाडका बाप्पा मग तुझं तर पहिलं घेईल.

गणेश : काय?

हेरंब : अरे कैवार (सगळे हसतात). Joke’s Apart अरे बघ त्या मुबंईवासीयांची स्पिरीट एवढं सगळे झेलूनही (मेट्रोचा पुलही) नव्या दमाने तुझ्या तयारीत गुंग झाले आहे.

सिध्देश : ये दिल मुश्किल है जिना यहा.. जरा हसके जरा बचके.. यह है मुबंई हे मेरी जान..

हेरंब : वाह.. वाह.. आता कळलं गणेश जाशील ना (सगळे भावुक होतात)?

गणेश : हो नक्की जाईल आणि त्याचं हे spirit टिकण्यासाठी त्यांना अनेक आशिर्वाद ही देईल (सगळे टाळया वाजवतात).

चिंतामणी : चला एक problem solve. आणखी काही कुणाला समस्या?

गजानान : Internet Connection चे काय? Facebook, Twitter आम्हाला access करतात येईल का?

चितांमणी : हो त्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला एकमेंकाच्या संपर्कात राहाणं जास्त सोयीचं होणार आहे. अधुनमधुन आम्ही स्वर्गातुन ही tweet करत जाऊ.

गजानन : Wow, so sweet of u

चिंतामणी : पण कूणीही याचा गैरफायदा घ्यायचा नाही विषेशत: youngsters . नुसतं chat करायाचं नाही तर भक्तांना आशिर्वाद ही दयायचेत.

हेरंब : चला आता राखी, सल्लू, नाना, शाहरुख यांच्याकडे कॊण जाणार हे ठरवू या?

चितांमणी : सिध्देश तु राखी कडे जा तशीही तुला गाण्यांची फार आवड आहे.

सिध्देश : राखीकडे नको रे बाबा. खुप तमाशा करते ती. तिच्या Item Songs नि तर घेरी येते मला.

हेरंब : अरे मग १० दिवस तुला फुल entertainment.

सिध्देश : अरे जर तिने माझा साक्षात्कार झाला आहे अशी आवई उठवली तर, किंवा प्रसिद्धीसाठी मला एका लफडयात ओढलं तर, नाहितर माझ्याबरोबर ईथे येण्याचा हट्ट केला तर… मला तर कल्पना हि करवत नाही तिच्या नॄत्याची i mean तांडवनृत्याची.

चितांमणी : अरे मग घेऊन ये तिला ( सगळेजण खो खो हसतात).

हेरंब : अरे सिध्देश तसलं काही होणार नाही सध्या थंडावली आहे ती. केलाच तमाशा तर एन्जॉय कर.

चिंतामणी : गजानन या वर्षी तुझी लालबागच्या राजाच Assistant म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. (सगळेजण टाळया वाजवतात).

हेरंब : हे पद नवीन निर्माण करण्यात आलं आहे. राजाच्या दर्शनासाठी भक्तगण अलोट गर्दी करतातच पण दिवसेंदिवस सेलिब्रेटीजचा ताफाही वाढतो आहे. त्यात यावर्षी बेटी बी ची ही भर पडली आहे.

चितांमणी : बिग बॉस आणि करोडपती कडून ही आमंत्रण आलं आहे. याबतीत अजून निर्णय झाला नाही.

चैतन्य : या वर्षी तर म्हणे राजाचा ५० कोटी चा विमा उतरवला आहे. आता तर राजा बरोबर गजननचाही राजेशाही थाट असणार.

हेरंब : काय रे काय खुसपुस चालली आहे तिकडे विनायक..?

विनायक : काही नाही, वरद सकाळपासून मागे लागलाय माझ्याबरोबर पुण्याला येण्यासाठी.

हेरंब : अरे पण त्याला अजून १८ पुर्ण नाहीत, नियम माहीत नाही का त्याला?

विनायक : नियम माहीत आहेत पण म्हणे चिल्लर पार्टी बघायची आहे. ती लहानांसाठीच असते. चिल्लर पार्टी म्हणजे काय रे भाऊ?

हेरंब : (डोक्याला हात लावून) हे प्रकरण वेळीच रोखलं पाहीजे. काही नाही रे काहीजणांची बुध्दी विनाशाच्या दिशने वाटचाल करत आहे. पृथ्वीवर गेल्यावर कळलेच तुला. त्यांना चांगली बुद्धि दे, तेवढच तुझ्या आणि माझ्या हातात आहे.

विनायक : बुध्दी तर मी समस्त पुणेकरांना देणार आहे त्यासाठी मी खास बजेट आखले आहे ?

चैतन्य : ते कशासाठी?

विनायक : नवनवीन पाट्या लिहण्यासाठी ( सगळे हसतात).

चैतन्य : एवढं कौतुक करु नको. उदया तुझ्याच मंडपात पाटी लावतील “गणपती मोदक खात नाहीत. देव हा माणसात असल्यामुळे गणपती समोर मोदकांचा ढिग न घालाता, ते कार्यकर्त्यांच्या मुखी लावावावेत”. मग बस बोंबलत (जिभ चावून)..

वरद : (निरागसपणे) म्हणूनच त्यांना भामटे म्हणतात का?

विनायक : पुणेकरांची ही पदवी काढण्या करता काही करता येइल का?

हेरंब : अशक्य, कारण संपुर्ण महाराष्ट्रने त्यांना हा बहाल केलेला सन्माम आहे. (सगळेच हसतात)

बाल गणेश : येताना मात्र मला चितळेंची बाकरवडी नक्की आणा हं.

विनयाक : अरे काय रे तु गणपती आहेस की आणखी कॊण? मोदक मागायचे सोडून चक्क बाकरवडी मागतोस.

बाल गणेश : मोदकांचा कटांळा आलाय जरा काही तरी चटपटा पाहिजे.

“इथे ना पिझ्झा, बर्गर, भेळपुरी नि पाणीपुरी
जाईन जेव्हा मुंबापुरी चाखेन एकदातरी

(बाल गणेशाच्या या काव्यावर सगळे मनमुराद हसतात.)

चैतन्य : आता खाद्य पुराण पुरे आता, मला एका गंभीर विषयावर बोलायचे आहे.

चितांमणी : येताना आम्हाला खुप त्रास होतो ते पी.ऒ.पी. पाण्यात विरघळतच नाही.

सगळेचजण :  हो.. हो..

चिंतामणी : पृथ्वीवर भक्तांचा पर्यावरण पुरक दृष्टीकोन वाढतो आहे. त्याची सूरवात काही ठिकाणी झाली आहे. पण अगामी काळात भक्तांचा हा दृष्टीकोन वाढीस लागेल असा आशिर्वाद त्यांना आपण देऊ या.