Tag Archives: गर्भपात

स्त्रीरोग-समज आणि गैरसमज

एक सुशिक्षित गृहस्थ, त्यांच्या पत्नीला  प्रथमच दिवस राहिले असताना, तिसऱ्या महिन्यात त्रास होत होता म्हणून तपासणीसाठी घेऊन आले. गर्भ व्यवस्थित वाढत असल्याची खात्री करून त्यांना इतर सूचना दिला. त्यातच “शक्यतो संबंध ठेवू नका” असं सांगितलं. त्यावर त्यांनी उलट विचारलेला प्रश्न म्हणजे- “पण डॉक्टर, आम्ही जर नियमित संबंध नाही ठेवला तर मग गर्भ पोसला कशावर जाईल ?”
अशाच तऱ्हेचे अनेक गैरसमज-स्त्री जीवनातील खास क्षमतेविषयी  म्हणजेच मासिक पाळी, गर्भधारणा बाळंतपण वगैरेच्या बाबतीत स्त्रियांच्या व पुरुषांच्या मनात घर करून आहेत, आणि अज्ञानापेक्षाही काही वेळा चुकीचे ज्ञान ( म्हणजेच गैरसमज ) जास्त त्रासदायक ठरतात. अज्ञानी माणूस समजून घेण्याच्या मनःस्थितीत असतो. पण गैरसमज बाळगणारी व्यक्ती ‘आम्हाला सर्व काही माहिती आहे.” ह्या भ्रमातच वावरत असते.

गरोदरपणी पति पत्नी संबंध :
गरोदरपणी पति समागम करण्याने गर्भपात किंवा अपुऱ्या दिवसाचं बाळंतपण होण्याची शक्यता वाढते- ती ‘धक्का’  लागण्यामुळे असंच आतापर्यंत आपण समजत होतो. परंतु आता संशोधनानं असं सिद्ध झालं आहे की, वीर्यामध्ये असे काही घटक आहेत की ज्याच्यामुळे गर्भाशयाला कळा येतात. याच तऱ्हेची इंजेक्शन उपलब्ध असून त्यांचा गर्भपात करण्यासाठी किंवा बाळंतपण सुरू करण्यासाठी  ( Indduction of Labour )  केला जातो. तेव्हा गरोदरपणी, विशेषतः पहिल्या चार महिन्यात आणि पूर्वी कधी गर्भपात झाला असल्यास “शारीरिअक” संबंध न ठेवणं श्रेयस्कर असते. या काळात आणि सबंध गरोदरपणात पत्नीला पतीकडून निराळ्या अर्थांनी भरपूर प्रेम मिळायला हवं ! गरोदरपण हा काही आजार नव्हे, तरीपण दर महिन्यातून एकदा तरी तज्ञ डॉक्टरांकडून तपासून घेणं, आवश्यक आहे. कारण रक्तदाब वाढणं, लघवीत दोष येणं, जुळी असणे, मूल पायाळू किंवा आडवं असणं वगैरे सारखे महत्त्वाचे दोष गरोदर स्त्रीला ओळखता येता नाहीत.

गरोदरपणातील औषधे, आहार व मुलाचे वजन :
डॉक्टर गरोदरपणात खूपच औषधं देतात, त्यामुळं मूल पोसलं जातं असा एक मोठा गैरसमज साधारण लोकातच आहे, तर काही डॉक्टरच्या मनातपण आहे. पण आईला औषध दून गर्भाचं वजन वाढवताच येत नाही. हे शास्त्रीय सत्य आहे. गर्भ हा बांडगूळ’  ( Parasite )  सारखा वाढतो. त्याला जे हवं ते सर्व आईच्या रक्तातून गर्घ शोषून घेतो. म्हणूनच वरून अशक्य वाटणाऱ्या स्त्रीलासुद्धा ( स्त्रीरोगाबद्दल आपल्यकडे अनेक गैरसमज आहेत. तसेच स्वतः स्त्रीच आपल्या आजाराकडे बऱ्याचवेळा दुर्लक्ष करीत असते. हे प्रकृतीच्या दृष्टीने अत्यंत अयोग्य असते. ) ८ ते १० पौंडाचीसुद्धा मुलं होतात. त्या उलट अतिशय सदृढ स्त्रीचं पुऱ्या महिन्याचं-मूलसुद्ध काही वेळा फक्त ४ ते ५ पौंडाचा होतं. समजून घेण्याची गोष्ट एवढीच की, गर्भाचं वजन हे आईच्या आहारा औषधापेक्षा जास्त आनुवंशिक गोष्टींवर अवलंबून असतं. गरोदरपणी दिलेली औषध ही गर्भापेक्षाही आईला काही कमी पडू नये, तिची प्रकृती खराब होऊ नये म्हणूनच दिलेली असतात. त्यांचा प्रत्यक्ष गर्भावर परिणाम फारच थोडा होतो.

गर्भधारणा झाली असल्यास, आणि गर्भ व्यवस्थित वाढायला हवा असल्यास योग्य आणि भरपूर आहाअ घेणं अत्यंत आवश्यक आहे. उलट्या, मळमळणं यावर औषधी उपायकरून त्या थांबविता येतात. शिवाय या काळात, काय खावं याकडं जास्त लक्ष नदेता कोणताही रुचेल-पचेल तो आहार पोटात जाणं आणि टिकणं याकडं लक्ष दिलं पाहिजे. केळी, पपई किंवा असेच काही अन्य पदार्थ खाऊ नयेत असा एक गैरसमज आहे. परंतु कोणत्याही विशिष्ट पदार्थांच्या सेवनाने गर्भपाट होतोत असं आढळलेलं नाही. उलट आहार न घेण्यामुळं किंवा करण्यामुळं गर्भपात होऊ शकतो. गरोदर स्त्रियांनी कडक उपवास तर मुळीच करू नयेत. गर्भाला उपवास घडविण्यात कोणतंच पुण्य नाही. उलट लहान अर्भकाला उपाशी ठेवण्याचं पापच अंगी लागेल.

दिवस गेल्याचे कळण्यासाठी चाचण्या
गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी हल्ली  `Testing’ ची इंजेक्शनं घेण्याची जरुरी राहिलेली नाही. उलट अशा तऱ्हेच्या इंजेक्शन्समुळे गर्भामध्ये विकृती येण्याची शक्यता आढळलेली आहे. म्हणून इंजेक्शनाऐवजी हल्ली लघवीची तपासणी करून गर्भधारणा असल्याची किंवा नसल्याची पाच मिनिटांत खात्री करता येते. त्याचाच वापर जासत करायला हवा.

यशस्वी बाळंतपण
गरोदरपणाप्रमाणेच बाळंतपणाविषयीही अनेक गैरसमज आहेत. यशस्वी बाळंतपण याचा अर्थ टाक्याशिवाय, ऑपरेशनशिवाय   ( बाळंतपणा नंतर बाळाच्या तब्येतीकडे लक्ष देताना स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड होऊ न देण्यासाठी काळजी घ्यावी. ) बाळंतपण असं समीकरण मांडलेलं दिसतं, ते मुळात चुकीचे आहे. ज्या बाळंतपणाच्या शेवटी मूल आणि आई सुखरुप असतात, ते बाळंतपण यशस्वी, नॉर्मल अशी व्याख्या आहे. मात्र ते टाक्याचं किंवा शस्त्रक्रियेचं असलं तरीसुद्धा ! कारण टाके घालणं किंवा शस्त्रक्रिया ( फॉर्सेप्स किंवा सिझेरियन ) ही मुलाला किंवा आईला धोक्यातून वाचविण्याकरिताच करतात. हा शास्त्रीय दृष्टीकोन समजून घ्यायला हवा. पूर्वी १८-१२ मुलं होत असत- काही मुले बाळंतपणात गेली तरी वावगं मानत नसत. परंतु आज प्रत्येक मुल हा एक नवीन जीव आहे आणि त्याला वाचविणं आणि सुरक्षितपणे या जगात आणणं यासाठी काहीही करावं लागलं तरी ते रास्तच आहे हा दृष्टीकोन ठेवायला हवा.

खालून होणाऱ्या बाळंतपणांतसुद्धा टाके घालावे लागल्यास त्यामुळे पुढे उद्भवणारा योनिभागाचा ढिलेपणा  ( Protapse ) टाळता येतो. योग्य वेळी टाके न घातल्यास उतारवयात ‘माय‍अंग’ बाहेर पडून मोठी शस्त्रक्रिया करून घेण्याची वेळ येते. याचा अर्थ प्रत्येक बाळंतपणात टाके घालावेच लागतात असा नव्हे. पण टाके घालावे लागले, विशेषतः पहिल्या बाळंतपणात, तर त्यात वावगं काहीच नाही हे समजूत घ्यायला  हवं. त्याचप्रमाणं बाळंतपणानंतर प्रकृती पूर्ववत व्हावी म्हणून परंपरेनं ज्या काही गोष्टी इष्ट मानल्या आहेत. त्यातलासुद्धा अंधश्रद्धेचा भाग सोडून, उपयुक्त व व्यवहार्य तेवढा भाग स्वीकारायला हवा. उदाहरणार्थ   पोट बांधणं किंवा शेक शेगडी घेणं घेणं. गरोदरपणात पोटाचे स्नायू ताणले गेल्यामुळं बाळंतपणानंतर लगेच पोट थोडं शिथील वाटतं पण पोट बांधून ठेवल्यानं ते ‘सुटायचं’ टाळता येतं हा गैरसमज आहे. बाळंतपणानंतर शक्य तेवढ्या लवकर ( सिझेरियन झाले असल्यास टाके भरून आल्यावर ) पोटाचे व्यायाम सुरू करावे. सुरुवातीला झोपूनच किंवा बसून ( व नंतर उभं राहून ) श्वास पूर्ण बाहेर सोडून पोट आत ( खपाटीला ) ओढून घ्यावे. जेवढा वेळ धरता येईल तेवढा वेळ, घट्ट धरावे व मग पूर्ण सैल सोडावे याप्रमाणे सकाळी, दुपारी संध्याकाळी व रात्री १०-१० वेळा केल्याने पोटाचे स्नायू घट्ट होतात. पुढे हळूहळू शाळेतील  P.T. चे व्यायाम किंवा योगासनापैकी काही आसने ( शलभारून, सर्वांगासन, हलासन, भुजंगासन वगैरे ) करावीत.

ज्यांना काही कारणास्तव जास्त दिवस किंवा काही आठवडे अंथरुणातच पडून रहावं लागतं, ( रक्तस्त्राव होऊन किंवा ताप येऊन अशक्तपणा आला असल्यास ) त्यांना व्यायाम करणे अशक्य असल्याने अशा बाळंतपणासाठी सबंध अंगाला मॉलिश करून घेतले तर व्यायामाइतका हलकेपणा शरीराला वाटेल.

कुटुंबनियोजन
बाळंतपणानंतर मासिकपाळी पूर्ववत सुरू व्हायला काही  महिन्यचा काळ लागतो. अंगावरचंच दूध पाजत असलेल्या स्त्रियांना कित्येकदा ६ महिने ते वर्षांपर्यंतही पाळी सुरू होत नाही. परंतु या काळात गर्भधारणा होणं पूर्णतः शक्य असतं हे लक्षात ठेवायला हवं. यासंबंधीच्या गैरसमजूतीतूनच आणि लौकर तपासून न घेतल्यामुळे-फार उशीर होतो आणि मग नको असलेलं मूल ‘पदरात’ पडतं, तेव्हा संतती नियमनासाठी पाळी सुरू होईपर्यंत वाट पहाण्याची जरुरी नाही, बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर लगेच एकदोन आठवड्यातच संतती नियमनाची काळजी घ्यायला सुरू करायला हवं.

‘लूप’ ऐवजी अलिकडेच नव्याने वापरली जाणारी ‘कॉपर टी’  (cut)  सारखी साधनं जास्त सुखाची आहेत. ‘लूप’ किंवा कॉपर टी’ सारख्या साधनांनी कॅन्सर सारखा रोग होऊ शकतो, हा गैरसमज आहे. ‘लूप किंवा कॉपर टी’ ही साधने फक्त पाळणा लांबण्यासाठी असतात म्हणजेच त्यांच्या वापराला २-३ वर्षांपर्यंतचा निर्बंध असतो. ही साधने कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनच्या ऐवजी वापरण्याची साधने आहेत. अंगावरून फार जाणे, पोटात दुखणे इत्यादी त्रास सुरू झाल्यास लूप किंवा कॉपर टी काढून टाकता येते व इतर साधने कुटुंब नियोजनासाठी वापरता येतात.

संततीनियमनाची शस्त्रक्रिया ही शरीराच्या कोणत्याही इतर भागाशी किंवा कार्याशी संबंधीत नसते. म्हणूनच त्यापासून होणार परिणाम म्हणून जे सामान्यतः समजले जातात ते सर्वच काल्पनिक किंवा गैरसमजुती पोटी असतात. उदाहरणार्थ पोट सुटणं, वजन वाढणं, कामवासना कमी किंवा जास्त होणं, केस गळणं, अशक्तपणा येणं, पाळी अनियमीत होणं ! मुळात शस्त्रक्रिया जर नीट झाली असेल आणि नंतरच्या तपासणीत जर कोणताही दोष आढळला नाही तर वरीलपैकी कोणत्याही तक्रारीचा शस्त्रक्रियेशी संबंध जोडता येत नाही.
संतती नियमनाच्या शस्त्रक्रियेविषयी वर जी चर्चा केली. तीच पुष्कळ अशी गर्भाशय काढण्याच्या  ( Hystereclony )शस्त्रक्रियेसंबंधी पण खरी आहे. ही शस्त्रक्रिया साधारणतः चाळीशीच्या नंतर करतात, पण जरुरी वाटल्यास त्याआधीसुद्धा करण्यास हरकत नसते. कारण या शस्त्रक्रियेत ‘स्त्रीग्रंथी’ ( Gvaries ) काढून टाकत नाहीत आणी स्त्रीचं हे गर्भाशयावर अवलंबून नसतं तर स्त्रीग्रंथीवर ! म्हणून गर्भाशय काढण्याची स्त्री ही शारीरिक व मानसिक दृष्टचा पूर्णतः स्त्रीच रहाते. फक्त मासिकपाळी येणं व मूल होणं या दोन गोष्टी बंद होतात. पण या दोन्हीपैकी मुलं होण्याचं बंद झाल्यावर मासिक पाळीला तसा काहीच अर्थ ( Signifieance )  नसतो. ती येणं आणि न येणं यावर प्रकृती अवलंबून नसते. म्हणून ती शस्त्रक्रिया करून बंद झाल्यास काहीच बिघाड होत नाही.

मासिक पाळी
मासिकपाळीसंबंधीच आणखी अनेक गैरसमजुती आहेत. पाळीला जास्त रक्तस्त्राव झाल्यास चांगलं असा एक अत्यंत चुकीचा समज पुषकळांच्या मनात आहे. रक्त हे रक्त आहे आणि शरीराच्या दृष्टीकोनातून रक्त हे जीवन आहे. तेव्हा ते कुठूनही जास्त प्रमाणात वाहणं हे धोक्याचं आहे. ‘निदान’ हा शिक्का मारला म्हणजे तो खूप गेला तरी योग्य असं समजू नये. याउलट विटाळ कमी जाण्याला काही स्त्रिया फार धोक्याचं समजतात. विटाळ (रक्त) जास्त वाहणं जसं धोक्याचं आहे तसं कमी जाणं हे मुळीच धोक्याचं नाही. कमी जाण्यामुळं अंगात रक्त टिकून रहातं व प्रकृती सुधारते. पण स्त्रिया  याला ‘लठ्ठपणा’ समजून विटाळ जास्त जावा म्हणून औषधं घेतात. विटाळ कमी गेल्यानं लठ्ठपणा येत नाही. तर उलट कशानंही लठ्ठपणा आल्यास त्यामुळे विटाळ कमी जातो अशी खरी गोष्ट आहे. म्हणून विटाळ ‘साफ’ जाण्यासाठी काहीही उपाय-योजना करण्याची जरुरी नाही. उलट व्जन कमी करणे हा म्हटलं तर त्यावरचा उपाय आहे.

त्याचप्रमाणं विटाळ नियमित किंवा अनियमित असणं आणि मूल होणं याचाही काही परस्परसंबंध नाही. पाळी अनियमित असली तरीही गर्भधारणा होते हेलक्षात ठेवायला हवं. उलटपक्षी अनियमित असलेली पाळी मुद्दाम नियमित करायला गेल्यास गर्भधारणा व्हायला वेळ लागतो. गर्भधारणा न होण्याची इतर कारणं आहेत- त्या सर्वांची छाननी होणं जास्त जरुरीचं असतं-गर्भधारणेसाठी पाळी नियमित करण्याची मुळीच जरुरी नाही.

क्युरेटिंग :
याचप्रमाणे क्युरेटिंग करून मुलं होतात असा आणखी एक मोठा गैरसमज आहे क्युरेटिंग  ( D and c )  ही एक तपासणी आहे- गर्भधारणेच्या आड येणाऱ्या काही कारणांचा उलगडा होण्यासाठी ! आणि करावयचंच असेल तर हे क्युरेटिंग मासिक पाळीच्या आधी ( नंतर नव्हे ) करावे लागते. पण ‘पिशवी साफ’ करण्याच्या उद्देशानं पुष्कळवेळा पाळीनंतर क्युरेटिंग करतात. पिशवी ( गर्भाशय) कधीच घाण नसते-तेव्हा ती साफ करणं हीच मुळी चुकीची समजूत आहे. याउलट गर्भपात अर्धवट झाला असल्यास तो पूर्ण करण्यासाठी क्युरेटिंग करायंच लागतं. नाहीतर खूप रक्तस्त्राव होऊन अशक्तपणा येतो. पण क्युरेटिंगमुळे किंवा एरवी सुद्धा एकदा गर्भपात झाला म्हणजे ‘गर्भपाताची’ सवय लागते अशा एक समज आहे. गर्भपात अनेक कारणामुळे होतात. त्याची तपासणी होऊन एकाच कारणांमुळे पुनः पुन्हा गर्भपात होतात. की दरवेळी निराळी कारणं असतात हे तपासून ठरवायला लागतं. गर्भपाताची सवय लागणं असा प्रकार नसतो. योग्य कारण हुडकून काढल्यास ही स्वय तोडता येते.

गर्भपात
पहिल्या तीन महिन्यातले पुष्काळसे गर्भपात हे टाळता येतातच असे नाही, कारण पुष्कळदा गर्भ-बीजच मुळात खराब  ( Genetie defects )  असतं. याउलट दुसऱ्या तिमाहीतील गर्भपात हे पुष्कळच प्रमाणात टाळता येतात-विशेषतः गर्भाशयाच्या तोंडाचा अधूपणा आढळल्यास त्याला टाके घालून पूर्ण दिवस होईपर्यंत गर्भ टिकविता येतो. गर्भ जितका मोठा व जास्त दिवसांचा असेल तेवढा सशक्त असतो. एक जुना गैरसमज आहे की, सातव्या महिन्यापेक्षा आठव्या महिन्यातील मूल जास्त अशक्त असतं व ते जगत नाही. पण ह निव्वळ गैरसमज आहे. याला कोणताच शास्त्रीय आधार नाही. योग्य काळजी घेतल्यानं सातव्यापेक्षाही आठव्या महिन्यातलं मूल जगण्याची व नीट वाढण्याची जास्त शक्यता असते हे सत्य आहे.

बालकासंबंधी गैरसमजुती :
मूलजन्माला आल्यावर त्या तान्ह्या अर्भकाविषयीच्या काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.पहिली म्हणजे मुलगा असो की मुलगी- काही बाळांना जन्मतःच स्तनांची थोडी वाट असते. ही दुधांची गाठ आहे म्हणून पिळून काढण्याची शिकवणूनक घातक आहे. त्या गाठी चार-सहा दिवसात आपोआप विरतात. काहीही न करणे हाच त्यावर उपाय त्याच कारणास्तव ( आईच्या रक्तातील  Hormones मुळं) काही नवजात बालिकांना थोडा ऋतुस्त्रावपण होतो. त्यावरसुद्धा काहीच करायचं नसतं. ते आपोआप थांबत. तसंच बाळाच्या डोक्यावर येणारं टेंगूळ हे सुद्धा दीड दोन महिन्याच्या अवधीत आपोआप सपाट होतं. त्याला चोळण्यानं इजा पोचू शकते. इथंही काही न करणं हाच उपाय असतो.वरील सर्व उदाहरणावरून हे लक्षात येईल की अनेक गैरसमज आपण मनात बाळगतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष देत नाही. विज्ञानपण रोज बदलतं. नव्या नव्या शोधामुळं जे ठरतं म्हणूनच अनेक जुन्यात जुन्हा वाटणाऱ्या गोष्टी विज्ञानाच्या उजेडात नव्या म्हणून स्वीकारल्या जातात. विज्ञानातसुद्धा परंपरा असते. नवीन शोध एकदम स्वीकारले जात नाहीत.तेव्हा गैरसमजुती टाळण्याचा एकच उपाय म्हणजे- बदलत्या काळाबरोबर आपणही बदलतं राहाणं. कोणतेही समज “पक्के” असे न मानता, “आज माहिती आहे त्यानुसार सत्य” एवढंच त्याला महत्त्व देणं हेच योग्य आहे.