Tag Archives: गोळे

मेथीचे गोळे

साहित्य :

  • १ मध्यम आकाराची मेथीची जुडी
  • १ वाटी डाळीचे पीठ
  • ५-६ हिरव्या मिरच्य़ा
  • थोडी कोथिंबीर
  • १/२ चमचा धणे कुटून
  • मीठ
  • हळद
  • मोहनासाठी तेल

कृती :

मेथीचे गोळे

मेथीचे गोळे

मेथी बारीक चिरुन घ्यावी व धुवून चाळणीवर निथळत ठेवावी. मिरच्या बारीक चिराव्यात.

नंतर सर्व एकत्र करुन पीठ बिजवावे. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करावेत व किंचित लांबट आकार द्यावा.

नंतर कुकरमध्ये चाळणीला तेलाचा हात लावून त्यावर हे गोळे वाफवून घ्यावेत.

गार झाल्यावर कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करुन त्यावर परतावेत.

फार छान लागतात. लहान मुलांनाही फार आवडतील.