Tag Archives: गोष्ट

गिरिजात्मज गणेश स्थापना

गिरिजात्मज गणेश स्थापना

गिरिजात्मज गणेश स्थापना

हिमकन्या आणि शिवपत्नी पार्वती हिला विनायकाने आपल्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा होती. म्हणून तिने लेण्याद्रीच्या गुहेत बारा वर्षे कठोर तप केले. याकालावधीत पार्वती मातीची मूर्ती करुन विनायकाची पूजा करत असे. तिच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गणेश बटूस्वरुपात पार्वतीच्या समोर प्रकट झाले आणि या लेण्याद्रीमध्येच वास्तव्य करुन राहिले. येथेच गौतमऋषींनी गणेशचे मौंजीवंदन केले. गिरिजात्मज स्वरुपातच त्याने अनेक दुष्टंचा संहार करुन सज्जनांचे रक्षण केले. शेष, इंद्र, यम यांचे गर्वहरण केले आणि आपले अवतारकार्य संपल्यावर याच लेण्याद्रीमध्ये गुप्त झाला.

पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील निसर्गरम्य प्रदेशातील डोंगरात सुमार तीनशे पायऱ्या चढून गेल्यावर डोंगरातच कोरलेल्या अतिभव्य दालनात हा ‘गिरिजात्मज’ गणेश भक्तांना दर्शन देत असतो.