Tag Archives: चकल्या

शिंगाड्याच्या पीठाच्या चकल्या

साहित्य :

  • शिंगाड्याचे पीठ
  • वाटलेल्या हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • जिरेपूड
  • थोडे ताक ( आवडीप्रमाणे).

कृती :

पीठ मोजून घ्या. लहान पातेलीभर पीठ असेल तर त्यापेक्षा थोडे कमी पाणी घेऊन उकळण्यास ठेवा. उकळी झाली की त्यात ताक, हिरव्या मिरच्या, मीठ आणि जिरे-पूड घाला. नंतर शिंगाड्याचे पीठ घालून ढवळा व उतरवून ठेवा.थोड्या वेळाने मळून चकल्या करा व गरमागरम खायला द्या. ह्या चकल्या अगदी आयत्या वेळी व थोड्याच करायच्या असल्याने प्रमाणाची जरूर नाही.