Tag Archives: चर्मकला

कारागिरी

सोलापूर येथील सोमा घराण्याने विणलेला हा भित्ती पडदा
जगातील अनेक देशांमध्ये झपाट्याने होत चाललेल्या औद्योगीकरनामुळे हस्तकलांपरंपराना उतरती कळा येत चालली आहे. केवळ औदोगिरकरणामुळे हस्तकलांन हा धोका निर्माण झाला असे नाही; परंतु भक्कम आर्थिक पाठबळ; मोढ्या प्रमाणावर उत्पादन आणि कार्यक्षम विपणन यामुळे उद्योगधंदा ही अशी एक संय्क्त शक्ती झालेली आहे की, एखादे दृढ भक्कम हस्तकला व्यवसायकेंद्रही तिला तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे अपरिहार्यपणेच हस्तकला व्यवसायाला मरगळ आली आहे आणि, हस्तकलापरंपरा झपाट्याने नाहीशा होत चालल्यामुळे, देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसाही उणावत चालला आहे.

हातांनी वस्तू तयार करणार्‍या सगळ्यांचा हस्तकला व्यावसायिकात समावेश करता येत नाही हे स्पष्ट केले पाहिजे. वस्तू निर्माण करणारा आणि ती घडवणारा यांत सूक्ष्म फरक. औधोगिक कामगारही आपल्या हातांनी वस्तू तयार करतो; परंतु त्या वस्तूंची निर्मिती त्याने कल्पिलेली नसते.

हस्तकलाव्यावसायिकांची कलाकृती हाच त्यांचा वस्तू तयार असतो. त्यामध्ये त्यांचे मन, भावना आणि आत्मा गुंतलेले असतात. ती वस्तू निर्माण करताना वर्षानुवर्षे मेहनत घेऊन कमावलेले शिस्तबद्ध शिक्षण तो वापरतो. त्याच्या आधीच्या पिढ्यांप्रमाणेच त्यानेही साधने न्याहळलेली असतात आणि वस्तूंना आकार आणि घाट देताना तो वंशपरंपरागत कौशल्यच वापरतो. तरी सुद्धा हे करीत असताना भारतात हस्तकलाव्यावसायिक कारागीर आणि कलावंत यांच्यामध्ये फरक केला जात नाही. मुळात या दोन्हींसाठी शिल्पकार हा एकच शब्द वापरला जातो. हीच संज्ञा वास्तुशास्त्रज्ञालाही वापरली जाते हे लक्षणीय आहे.

छोटे हस्तकलाव्यवसाय