Tag Archives: चित्रपट

माधुरीला नव्या इनिंगची भेट

माधुरी दीक्षित-नेने

माधुरी दीक्षित-नेने

माधुरी दीक्षित-नेनेच्या वाढदिवसानिमित्त पुण्या-मुंबईतील तिच्या चाहत्यांनी एका ताऱ्याला तिचे नाव दिले. मुंबईतील गोरेगावच्या फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये त्याचे सर्टिफिकेट देण्यासाठी गुरुवारी चाहत्यांनी माधुरीची भेट घेतली. पुण्यातील स्मिता परमार, भाग्यश्री कुलकर्णी, कोमल कांबळे, पल्लवी जोशी, सुरभी मुश्रीफ, एप्रिल व्ही आणि मुंबईतील नितेश सहानी, हेमल गणात्रा, हर्षदा जोशी, अभिजीत फादळे व सुमलिका मुजुमदार या चाहत्यांना आपल्या बारा तासांपेक्षाही जास्त असलेल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून ती चाहत्यांना भेटली.

मराठी चित्रपटात कधी पाऊल टाकणार, अप्सरा आली या गाण्यावर नृत्य करणार का, टिकेकडे तुम्ही अकारण लक्ष देऊ नका, अशा प्रेमळ प्रश्नांचा आणि सूचनांचा तिच्यावर वर्षाव होत होता. चाहत्यांनी तिच्या आठवणींचा अल्बम सजवून तिला दाखवल्यावर तिच्या तोंडून नैसर्गिकपणे ‘भारी आहे’ अशी अस्सल मराठी प्रतिक्रिया तिने दिली.

‘मी ते सर्व करण्याचा नक्की प्रयत्न करीन जे तुम्हाला आवडते. चाहत्यांसाठीच मी काम करीत आहे आणि माझा हा सेकंड इनिंगचा आनंद तुमच्या प्रेमामुळेच द्विगुणीत झाला आहे,’ असे परिकथेतल्या अप्सरेसारखी सुंदर दिसणारी माधुरी म्हणाली.