Tag Archives: जागतिक दिवस

२३ ऑगस्ट दिनविशेष

शामू, सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा

शामू, सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा

जागतिक दिवस

ठळक घटना

 • १३०५ : देशद्रोहाच्या आरोपावरुन स्कॉटलंडच्या विल्यम वॉलेसचा वध.
 • १६३२ : विजापूरच्या आदिलशहाचा वजीर मरार जगदेव याने परिंडा किल्ल्यावर मोगलांच्या ताब्यात असलेली मुलुक-ए-मैदान तोफ विजापूर येथे आणली.
 • १७०८ : मैडिंग्नु पम्हैबाचा मणिपूरच्या राजेपदी राज्याभिषेक.
 • १७७५ : इंग्लंडच्या राजा तिसर्‍या जॉर्जने अमेरिकेतील वसाहतींनी उठाव केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.
 • १८६६ : प्रागचा तह – ऑस्ट्रिया व प्रशियातील युद्ध संपुष्टात आले.
 • १९१४ : पहिले महायुद्ध – जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली.
 • १९२९ : हेब्रॉन हत्याकांड – हेब्रॉन शहरात अरब दहशतवाद्यांनी सुमारे ६५ ज्यू व्यक्तींना ठार मारले व उरलेल्यांची हकालपट्टी केली.
 • १९३८ : इंग्लंडच्या लेन हटनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३६४ धावांची विक्रमी खेळी केली.
 • १९३९ : दुसरे महायुद्ध-मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार – या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनी व सोवियेत संघाने बाल्टिक देश, फिनलंड, रोमेनिया व पोलंडची आपापसात वाटणी करून घेतली.
 • १९४२ : दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई सुरू.
 • १९४३ : दुसरे महायुद्ध-खार्कोव्ह शहराचा वेढा फुटला.
 • १९४४ : दुसरे महायुद्ध-मार्सेल शहराचा वेढा फुटला.
 • १९४४ : दुसरे महायुद्ध – रोमेनियाने अक्ष राष्ट्रांचा साथ सोडून दोस्त राष्ट्रांशी संधान बांधले.
 • १९४४ : अमेरिकन सैन्याचे बी-२४ प्रकारचे विमान इंग्लंडच्या फ्रेकलटन शहरातील शाळेवर पडले. ६१ ठार.
 • १९५८ : मराठवाडा विद्यापिठाचा प्रारंभ.
 • १९७५ : लाओसमध्ये उठावात साम्यवादी पक्षाने सत्ता काबीज केली.
 • १९८९ : एस्टोनिया, लात्व्हिया आणि लिथुएनियातील सुमारे वीस लाख लोकांनी व्हिल्नियस-तालिन रस्त्यावर मानवी साखळी निर्माण केली.
 • १९८९ : ऑस्ट्रेलियातील १,६४५ वैमानिकांनी सामूहिक राजीनामा दिला.
 • १९९० : आर्मेनियाने सोवियेत संघापासून स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
 • १९९४ : पहिल्या महायुद्धातील एकमेव श्यामवर्णीय वैमानिक युजीन बुलार्ड याला मृत्युपश्चात सेकंड लेफ्टनंटचे पद देण्यात आले.
 • २००० : गल्फ एर फ्लाइट ७२ हे विमान इराणच्या अखातात मनामाजवळ कोसळले. १४३ ठार.

जन्म

 • १७५४ : लुई सोळावा, फ्रांसचा राजा.
 • १८५२ : क्लिमाको काल्देरॉन, कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८६४ : एलेफ्थेरियोस व्हेनिझेलोस, ग्रीसचा पंतप्रधान.
 • १९०९ : सिड बुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९१७ : टेक्स विल्यम्स, अमेरिकन गायक.
 • १९२१ : सॅम कूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९३१ : हॅमिल्टन ओ. स्मिथ, अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ.
 • १९३२ : हूआरी बूमेदियेन, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५१ : अखमद कादिरोव, चेच्न्याचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५१ : नूर, जॉर्डनची राणी.
 • १९६३ : रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९६७ : रिचर्ड पेट्री, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७३ : केरी वॉल्म्सली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७३ : मलाइका अरोरा खान, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यु

 • ६३४ : अबु बकर, अरब खलीफा.
 • ११७६ : रोकुजो, जपानी सम्राट.
 • १३०५ : विल्यम वॉलेस, स्कॉटलंडचा क्रांतिकारी.
 • १३८७ : ओलाफ चौथा, नॉर्वेचा राजा.
 • १८०६ : चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८९२ : देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
 • १९७१ : मूळ शामू, सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा.