Tag Archives: टिळक

माझा महाराष्ट्र – कविता

राज्यामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्र असे महान
या महान राष्ट्राचे आम्ही गातो गुणगान

फुले, टिळक, आगरकर इथे जन्मले लाल
स्वातंत्र्यासाठी त्यांनी भोगिले किती हाल

गिरिवरती सुंदर लेणी, मंदिरे कृष्ण पाषाणी
तुकयाची अभंगवाणी, लतादिदींची मंजुळ गाणी

आनंदीबाई जोशी पहिल्या महिल्या डॉक्टर
कृष्णा पाटीलने केले शिखर एव्हरेस्ट सर

भीमा, कृष्णा, गोदावरी अन्‌ उत्तुंग सह्यगिरी
या राज्याची राजधानी माझी मुंबई नगरी

डफाच्या थापेवरती गर्जे शिवबाचा पोवाडा
जाखडी अन्‌ लावणीने सारा देश झाला वेडा