Tag Archives: टॉमेटो

अख्खी मूगाची डाळ

साहित्य:

  • २५० ग्रॅम मूग
  • २०० ग्रॅम टॉमेटो
  • १ तुकडा आले
  • ४ हिरव्या मिरच्या
  • चवीप्रमाणे मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • धणे
  • आमसूल पावडर
  • १०० ग्रॅम तूप

कृती:

अख्खी मूगाची डाळ

अख्खी मूगाची डाळ

मूग निवडून पाण्यात भिजवा. पातेल्यात २ ग्लास पाणी टाकून मूग टाका. हिरवी मिरची, आले चिरुन टाका, टॉमेटो बारीक चिरुन टाका.

मीठ टाकून पातेले झाका. गॅस मोठा राहू द्या. मधे-मधे गरजे प्रमाणे गरम पाणी टाकत रहा.

जर डाळ घट्ट हवी असेल तर वरुन पाणी टाकू नका. डाळ शिजल्यावर गॅस बंद करा. तूप गरम करुन लाल तिखटची फोडणी द्या.

वाढताना कोथिंबीर व आमसूल पावडर टाका.