Tag Archives: डीटीई

ऑनलाईन प्रवेशाची तारीख २० जून

ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन सुविधा

ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन सुविधा

येत्या २० जूनपासून इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. इंजिनीअरिंग प्रवेशासाठीचा हा पहिला टप्पा आहे व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रामुख्याने या प्रक्रियेतून जावे लागते.

ऑनलाईन फॉर्म भरण्याबाबतचे वेळापत्रक www.det.org.in/fe2012 या वेबसाईटवर तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) जाहीर केले आहे. ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म याच वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एमएचटी-सीईटीचे आयडेंटिटी कार्ड किंवा स्कोअर कार्ड अर्ज स्वीकृती केंद्रावर बिद्यार्थ्यांना दाखवून विनामूल्य माहिती पुस्तीका मिळेल. असे आवाहन करण्यात आले आहे की, हा फॉर्म भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी ती माहिती व्यवस्थित वाचावी.

उमेदवाराने हा फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट घेऊन अर्ज स्वीकृती केंद्रावर स्वतः जाऊन सादर करायचा आहे. आवश्यक कागदपत्रांची यावेळेस तपासणीही करण्यात येणार असल्याने मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या अटेस्टेड छायाप्रतही उमेदवाराने जवळ ठेवायची आहे. माहितीपुस्तकेत आवश्यक कागदपत्रांची यादी उपलब्ध आहे. ‘डीटीई’ ने असे म्हटले आहे की, केंद्रीय प्रवेश प्रकियेसाठी पसंती क्रमाचा अर्ज भरण्याच्या प्रकियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.